उजनी लाभक्षेत्रात उष्णतेचा तडाखा, पारा ३५ अंशांवर
उजनीचा पाणीसाठा 80 टक्क्यांवर
सकाळ वृत्तसेवा
केत्तूर, ता.१५ ः उजनी धरणाच्या लाभक्षेत्रात ऑक्टोबर महिन्यात उष्णतेचा तडाखा वाढू लागला असून, तापमानाचा पारा ३५ अंश सेल्सिअसवर गेल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सध्या उजनी धरणात सुमारे ८० टक्के पाणीसाठा आहे. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठा कमी असल्याने आणि वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढण्याची शक्यता असल्याने आगामी काळात पाणी नियोजनाचे मोठे आव्हान उभे राहू शकते.
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ऑक्टोबर महिन्यात तापमानात वाढ जाणवत असल्याने नागरिकांसह शेतकरीही हैराण आहेत. परिणामी, उभ्या पिकांना पाण्याची गरज वाढत चालली आहे. उजनी लाभक्षेत्रात ऊस, केळी, कांदा व भाजीपाला आणि विविध फळबागांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. या पिकांना नियमित पाणी मिळणे आवश्यक असते. वाढत्या उष्णतेमुळे पिकांमधील पाण्याची गरज वाढल्यास शेतकऱ्यांना सिंचनासाठी अधिक पाणी वापरावे लागू शकते.
गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठा कमी असल्याने शेतकऱ्यांचे लक्ष धरणाच्या पाणी व्यवस्थानाकडे आहे. वाढत्या तापमानामुळे जलाशयातील बाष्पीभवन वाढू शकते. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा वापर आणि आगामी काळातील पाणीपुरवठ्याचे नियोजन महत्त्वाचे ठरणार आहे.
एकीकडे तापमानाचा पारा ३५ अंशांवर पोचला असल्याने शेतकऱ्यांसमोर दुहेरी आव्हान निर्माण झाले आहे. पिकांना वेळेवर पाणी मिळाले नाही, तर उत्पादनावर परिणाम होण्याची भीती आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा योग्य वापर, सिंचनाचे नियोजन आणि पाण्याचा अपव्यय टाळणे गरजेचे ठरणार आहे.
उजनी धरणातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे प्रशासनाने जाहीर केले असले तरी ते कशाप्रकारे केले जाणार आहे. या बाबतीमध्ये काहीही माहिती मिळू शकली नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.