पुणे

विदेश संक्षिप्त

CD

*युरोप
‘रशियाचे नुकसान’
किव्ह : काळ्या समुद्राच्या किनाऱ्यावर असलेल्या रशियाच्या नाविक तळावर मंगळवारी रात्री केलेल्या जोरदार हल्ल्यात या तळाचे मोठे नुकसान होऊन रशियाला मोठा धक्का दिला असल्याचा दावा युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदीमिर झेलेन्स्की यांनी केला आहे. या हल्ल्यासाठी जहाजभेदी क्षेपणास्त्रे, शक्तिशाली हवाई आणि सागरी ड्रोनचा वापर केल्याचा दावाही झेलेन्स्की यांनी केला. रशियाने चार वर्षांपूर्वी हल्ला केल्यानंतर युक्रेनने अत्याधुनिक ड्रोनची निर्मिती करत रशियात खोलवर मोठे हल्ले केले आहेत.

*पश्‍चिम आशिया
जहाजावर हल्ला
साना : इराणचे समर्थन असलेल्या येमेनमधील हौथी बंडखोरांनी आज बाब एल मंदेब सामुद्रधुनीतून जाणाऱ्या एका जहाजावर हल्ला केला. या हल्ल्यात जहाजावरील सहा जणांचा मृत्यू झाला. होर्मुझची सामुद्रधुनी बंद असल्याने सध्या लाल समुद्र आणि बाब एल मंदेब येथूनच जलवाहतूक होत आहे. सौदी अरेबियासाठी हा पर्यायी मार्ग आहे.

लीबियामध्ये हल्ले
कैरो : लीबियामधील झाविया या शहरावर मंगळवारी रात्री झालेल्या ड्रोन हल्ल्यात येथील वीज यंत्रणेचे मोठे नुकसान झाले. मागील काही दिवसांपासून लीबियातील वीज जाळ्यावर सातत्याने हल्ले होत असल्याने अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे. झाविया हे शहर देशाचे ऊर्जा केंद्र असल्याने येथील हल्ल्यामुळे जनता हवालदिल झाली आहे. या हल्ल्यांची जबाबदारी अद्याप कोणत्याही गटाने स्वीकारलेली नाही.

*आशिया
शांततेबाबत चर्चा
इस्लामाबाद : इराणविरोधातील युद्धावर तोडगा काढण्यासाठी पाकिस्तानचे अंतर्गत सुरक्षा मंत्री मोहसीन नक्वी यांनी इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्‍कियान आणि परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्याशी चर्चा केली. पाकिस्तानच्या मध्यस्थीने झालेल्या अमेरिका-इराण सामंजस्य कराराची अंमलबजावणी अजिबात होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर इराणमध्ये ही चर्चा झाली.

*उत्तर अमेरिका
वीस नोव्हेंबरला शिक्षा
वॉशिंग्टन : शीख फुटीरतावादी गुरपतवंतसिंग पन्नून याच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या निखिल गुप्ता या भारतीय व्यक्तीला शिक्षा सुनावण्याची तारीख लांबणीवर टाकण्यात आली आहे. आधी २५ सप्टेंबरला शिक्षा सुनावली जाणार होती, आता यासाठी २० नोव्हेंबर ही तारीख निश्‍चित करण्यात आली आहे.

तस्करीबद्दल दोषी
न्यूयॉर्क : कॅनडाच्या सीमेवरून नागरिकांना अमेरिकेत बेकायदा प्रवेश मिळवून देणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा भाग असलेल्या एका अमेरिकी महिलेला येथील न्यायालयाने दोषी ठरविले. ही महिला प्रामुख्याने भारतीय नागरिकांना अमेरिकेत प्रवेश मिळवून देण्याचे आश्‍वासन देत कॅनडामध्ये बोलावून घेत असे आणि तेथून बेकायदा मार्गाने त्यांना अमेरिकेत घुसवत असे, असे पोलिसांनी सांगितले.

*आफ्रिका
फेरीबोट उलटली
हरारे : झिम्बाब्वेमधील करीबा तलावामध्ये एक फेरीबोट उलटून १५ प्रवाशांचा मृत्यू झाला, तर २७ जण बेपत्ता झाले आहेत. या नावेमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. बचाव पथकाने ७७ जणांची सुटका केली. हे सर्व प्रवासी एका बेटावरून दुसऱ्या बेटाच्या दिशेने जात होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: मद्यपाशातून मुक्तीसाठी ५० रुग्णालयांत जनजागृती स्टॉल

टॉप थ्री वगळून ४ ते ६ नंबरच्या न्यायाधीशांची शिफारस; सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजियमने घेतलेल्या निर्णयावर प्रश्नचिन्ह

आयआयटीत मृत्यूचे सावट! २० वर्षांत १७१ विद्यार्थ्यांची आत्महत्या, धक्कादायक वास्तव समोर

SCROLL FOR NEXT