पुणे

उमर खालिदला जामीन नाकारणाऱ्या निकालावर सर्वोच्च न्यायालयाचीच नाराजी

CD

खालिदला जामीन नाकारणाऱ्या निकालावर नाराजी

अनिश्‍चित काळासाठी तुरुंगात ठेवता येणार नाही : सर्वोच्च न्यायालय

सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. १८ : अवैध कारवाया प्रतिबंधक कायद्यांतर्गतही (यूएपीए) ‘जामीन हा नियम आणि तुरुंगवास हा अपवाद’ हेच तत्त्व लागू होते, असे नमूद करीत सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिल्ली दंगल कटाच्या प्रकरणात सहा वर्षांपासून तुरुंगात असलेल्या उमर खालिद आणि शरजील इमाम यांना जामीन नाकारणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्याच निकालावर नाराजी व्यक्त केली.
अमली पदार्थांच्या पुरवठ्याने दहशतवादाला खतपाणी घातल्याच्या आरोपावरून ‘यूएपीए’अंतर्गत सहा वर्षांपासून तुरुंगात असलेल्या सईद इफ्तिखार अंद्राबीचा जामीन मंजूर करताना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना आणि न्या. उज्जल भुयान यांच्या खंडपीठाने निकालपत्रात न्यायालयीन शिस्तीचा दाखला देत हे मत नोंदविले.
केवळ काही गंभीर आरोपांमुळे एखाद्याला अनिश्चित काळासाठी तुरुंगात ठेवता येणार नाही. ‘यूएपीए’च्या कलम ४३ ड (५) मध्ये जामिनासाठी कडक अटी असल्या, तरी आरोपी दीर्घकाळ तुरुंगात असेल आणि खटला लवकर संपण्याची शक्यता नसेल, तर घटनात्मक न्यायालये जामीन देऊ शकतात, असे २०२१ साली केंद्र सरकारविरुद्ध के. ए. नजीब प्रकरणी दिलेल्या निकालात सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने स्पष्टपणे सांगितले आहे. ‘उमर खालिद आणि शरजील इमाम यांना जामीन नाकारताना सर्वोच्च न्यायालयाच्या दोन सदस्यीय खंडपीठाने या महत्त्वपूर्ण निकालाचे योग्य पालन केले नाही. संख्येने कमी न्यायमूर्तींच्या खंडपीठावर जास्त न्यायमूर्तींच्या खंडपीठाने निकालाद्वारे जाहीर केलेल्या कायद्याचे पालन करणे बंधनकारक असते. असा बंधनकारक निकाल पाळलाच पाहिजे किंवा त्याविषयी शंका असल्यास तो मोठ्या खंडपीठाकडे पाठवला पाहिजे. लहान खंडपीठ मोठ्या खंडपीठाच्या निर्णयाला कमी लेखू शकत नाही किंवा डावलू शकत नाही, हाच न्यायालयीन शिस्तीचा नियम आहे,’ असे न्या. उज्जल भुयान यांनी निकालात म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे न्या. अरविंदकुमार आणि न्या. एन. व्ही. अंजारिया यांच्या पीठाने पाच जानेवारी २०२६ रोजी उमर खालिद आणि शरजील इमाम यांना जामीन नाकारला होता. यूएपीएअंतर्गत २०१९ ते २०२३ दरम्यान दोषसिद्धीचे प्रमाण केवळ १.५ ते ४ टक्के असून ९४ ते ९८ टक्के आरोपी निर्दोष सुटले आहेत, या राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरोने संसदेत सादर केलेल्या आकडेवारीचाही सर्वोच्च न्यायालयाने उल्लेख केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parbhani GNM Paper Leak : परभणीत नर्सिंगचा पेपर फुटला, सुपरवायझरने बहिणाला WhatsApp वर प्रश्नपत्रिका पाठवली अन्... चौघांना अटक

IND VS SL 2ND TEST : हाताला पट्टी, मनात जिद्द! Rishabh Pant ला मैदानावर पाहून श्रीलंकन थरथरले; त्यात थोडक्यात विकेट हुकल्याने आणखी घाबरले Video

Mumbai: मुंबईत गणरायाच्या आगमनात संतापजनक प्रकार! मिरवणुकीत इमारतीवरून अंडी फेकल्याचा आरोप; माझगावमध्ये तणावाचे वातावरण

Marathi News Live Updates : वैजापुरात कचोरीत उंदराची विष्ठा आढळल्याने खळबळ

ST Bus : सहली, लग्नसोहळे, यात्रांचा प्रवास महागला! एसटीच्या प्रासंगिक करार भाड्यात ११ ते १९ रुपयांनी वाढ

SCROLL FOR NEXT