पुणे

वीज मीटर पेटीला शाॅर्ट सर्कीटमुळे भीषण आग

CD

शॉर्टसर्किटमुळे आग लागून
३२ वीज मीटर जळून खाक

उंब्रजमधील इमारतीतील प्रकार; वायरींसह साहित्यही जळाले

उंब्रज, ता. २७ : येथील चाफळ रस्त्यालगत एबीपी प्लाझा इमारतीतील वीज मीटरला शॉर्टसर्किटने आग लागल्याची घटना आज सकाळी आठच्या सुमारास घडली. यावेळी मोठ्या प्रमाणावर धूर बाहेर आल्याने हा प्रकार तेथील दुकानदारांच्या लक्षात आला. या आगीत ३२ डिजिटल मीटर जळून खाक झाले. आगीत मीटर, वायरींसह अन्य साहित्य जळून नुकसान झाले.

दरम्यान, आगीत संपूर्ण इमारतीची मीटर जळून खाक झाल्याने पुढील काही दिवस इमारत अंधारात गेली आहे. येथील पोलिस उपनिरीक्षक सागर खबाले यांच्यासह स्थानिक दुकानदारांनी ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केल्याने अनर्थ टळला. गेल्या तीन महिन्यांपूर्वी याच इमारतीतील एका दुकान गाळ्यात आग लागली होती. येथील चाफळ रस्त्याला एबीपी प्लाझा ही इमारत आहे. या इमारतीमध्ये हॉस्पिटल, मेडिकल, किराणा, कापड व फूटवेअरचे दुकान, तसेच पतसंस्था आहे. आज सकाळी या इमारतीच्या जिन्याखाली असणाऱ्या मीटरमध्ये अचानक आग लागली. या आगीत क्षणात राैद्ररूप धारण केले. त्यात एकाच ठिकाणी असणारी सुमारे ३२ डिजिटल मीटर जळून खाक झाली. मोठ्या प्रमाणावर ज्वाला व धुराचे लोट बाहेर आल्यानंतर शेजारील दुकानदारांच्या लक्षात हा प्रकार आला त्यानंतर त्यांनी संबंधित माहिती वायरमनला देऊन वीज प्रवाह बंद करायला लावला. त्यानंतर पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळवले. डिजिटल मीटरच्या माध्यमातून येथे वीज कनेक्शन सुरू होते. आग लागल्याचे कारण शोधण्यासाठी तपास व्हावा, अशी मागणी इमारत मालकांनी केली आहे. दरम्यान, आग लागलेल्या घटनेनंतर पाच तास उलटूनही महावितरणचे अधिकारी घटनास्थळी आले नव्हते. त्यामुळे या इमारतीतील व्यावसायिकांनी संताप व्यक्त केला.
------

B00791
किंवा
B00792
उंब्रज ः शाॅर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत जळून खाक झालेले वीज मीटर.
...................................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: लोकलचे वेळापत्रक कोलमडणार! अनेक गाड्या रद्द होणार; पण कधी? रेल्वे प्रशासनाची महत्त्वाची माहिती

IPL 2026 Date Change : इंडियन प्रीमिअर लीग २६ मार्च ऐवजी 'या' तारखेला सुरू होणार; जाणून घ्या त्यामागचं महत्त्वाचं कारण...

Home Loan: ८ वर्षे EMI, ३ थकलेले हप्ते आणि ६० दिवस; १.२ कोटींचे घर गमावले: भारतीय स्वीकारण्यास नकार देत असलेले सर्वात कटू वास्तव

Latest Marathi News Live Update : मार्वे पठारे वाडीतील अवैध बांधकामांवर कारवाई

Shahu Mill Memorial : शाहू मिलचा स्मारक आराखडा लवकरच उच्चस्तरीय समितीकडे; राजेश क्षीरसागर यांनी आराखडा सादर करण्याचे दिले आदेश

SCROLL FOR NEXT