पुणे

वाचक लिहीतात

CD

वाचक लिहीतात

आयुक्तांचे अभिनंदन आणि अपेक्षा
‘अनधिकृत बांधकामांसह नळजोडांवर कारवाईचा इशारा'' ही बातमी वाचली. शहरात स्वच्छता आणि शिस्त राखण्यासाठी महानगरपालिकेने आग्रही भूमिका घेतली आहे असे बातमीत म्हटले आहे. अनधिकृत जाहिराती, अतिक्रमणे, बेकायदेशीर नळ जोडण्या तसेच परवानगीशिवाय सुरू असलेल्या बांधकामावर कठोर कारवाईचा इशारा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिला आहे. तसेच पादचाऱ्यांना मोकळे आणि सुरक्षित मार्ग, अतिक्रमण मुक्त रस्ते याबाबत तत्काळ कारवाई करा असे आदेशही आयुक्त यांनी दिले आहेत. याबद्दल आयुक्तांचे अभिनंदन! आयुक्तांनी गेल्या महिना-दीड महिन्यांत अनेक वेळा विविध बैठकांत आदेश दिलेले आहेत. याबाबत ‘सकाळ’मध्ये यापूर्वीच आयुक्तांची बातमी प्रसिद्ध झालेली आहे. परंतु प्रत्यक्षात काय? महापालिकेच्या सर्वच भागांमध्ये वरील सर्व समस्या नागरिकांना रोज भेडसावत आहेत. महानगरपालिकेचे अधिकारी गोरगरीब लोकांना लक्ष करतात, परंतु राजकीय,दंडेलशाही करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करतात. घरटी तसेच विविध व्यावसायिकांकडे किती नळजोड आहेत याचे कधीही अचानक सर्वेक्षण झालेले नाही. त्यामुळे पाणी चोरी मोठ्या प्रमाणावर होत आहे. आयुक्तांनी स्वतः फक्त आदेश न देता वस्तुस्थिती व क्षेत्रावर नेमके काय काम चालू आहे हे प्रत्यक्ष पाहणे आवश्यक आहे. त्याशिवाय योग्य बदल दिसणार नाही.
- सुरेश लुनावत, किवळे
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Water Protest: दरवाजे उघडू ;राजू शेट्टी यांचा इशारा ;भिलवडी येथे कृष्णा नदीपात्रात सर्वपक्षीय आंदोलन

Loan Waive: शेतकऱ्यांना कर्जमाफीचा मार्ग मोकळा साडेआठ हजार जणांची यादी जाहीर; आतापर्यंत ५२ हजार १८४ शेतकरी पात्र

'एक होती चिऊ एक होता काऊ...' डॉ. नेनेंसाठी हे सातारी शैलीत माधुरीचा हटके उखाणा, Video पाहून नेटकरी म्हणाले...

Latest Marathi News Update : खासगी फायनान्स कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत प्रशासनाची बैठक

Karjat Tree Felling: कर्जत तालुक्यातील वृक्षतोडीचा भीमाशंकर अभयारण्याशी संबंध नाही;वनपरिक्षेत्र अधिकारी रणजित जाधव यांची माहिती

SCROLL FOR NEXT