पुणे

पुणे-सोलापूर महामार्गावर विनापरवाना खोदकाम

CD

लोणी काळभोर, ता. २२ : कोणतीही सुरक्षा न बाळगता आणि विनापरवाना खोदकाम करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी पुणे-सोलापूर महामार्गावरील थेऊर फाटा (ता. हवेली) येथे लोणी काळभोर पोलिसांनी जेसीबी चालक, मालक आणि ठेकेदारावर गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी पोलिस हवालदार बापू वाघमोडे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार जेसीबी चालक विनोद सुभाष चव्हाण, मालक मोहनिल ऊर्फ सनी सुनील खटाटे आणि ठेकेदार एम. डी. काझी खान (सर्व रा. कुंजीरवाडी) यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीत महामार्गावर जेसीबीच्या साह्याने चारी खोदण्याचे काम सुरू होते.
या कामासाठी संबंधित विभागाची कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. तसेच खोदकामाच्या ठिकाणी बॅरिकेडिंग किंवा सुरक्षेची साधने नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. खोदलेली माती थेट रस्त्यावर टाकल्याने वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. भरधाव वाहतुकीच्या ठिकाणी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने संभाव्य अपघात टळला आहे. महामार्गावरील अशा बेजबाबदार कामांवर प्रशासनाने कडक नियंत्रण ठेवावे, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif on Sunetra Pawar : सुनेत्रा पवार-प्रशांत किशोर भेटीवर हसन मुश्रीफांचं सूचक मौन; "मुंबईत काय घडलं माहिती नाही"

Bhira Hydroelectric Project : मुंबईच्या पाणीप्रश्नावर मोठा तोडगा! कोयना नव्हे, आता 'मुळशी'तून पश्चिमेकडे पाणी वळवण्याची मागणी; भिरा प्रकल्पातील 300 मेगावॉटमुळे होणार फायदा?

Gold Rate Today: बापरे! सोनं 84,000 हजारांनी महागलं; 4 दिवसांत मोठी वाढ; आता किती रुपयांना मिळतंय?

Latest Marathi News Live Update : सुनेत्रा पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीवर हसन मुश्रीफ काय म्हणाले

Katraj Dairy Milk Price: कात्रज डेअरीच्या दूध दरात वाढ; दुग्धजन्य पदार्थही महागणार... किती पैसे मोजावे लागणार?

SCROLL FOR NEXT