askhed 
पुणे

प्रशासन अडकलय कोरोनात, वाळू माफियांचे सुरू आहेत असले धंदे  

रुपेश बुट्टे

आंबेठाण (पुणे) : खेड तालुक्यातील आसखेड खुर्द आणि आसखेड बुद्रुक येथील भामा नदीत मोठ्या प्रमाणात बेकायदा वाळू उपसा होत आहे. विनापरवाना सुरू असलेल्या या उपशाने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असून, वाळू माफिया मात्र लॉकडाउनच्या काळात स्वतःचे उखळ पांढरे करताना दिसत आहे. विशेष म्हणजे, या भरमसाठ उपशाने येथे सुरू असणारे कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे काम रखडले आहे.

महसूलचे अधिकारी कोरोना लढ्यात गुंतलेले आहेत. याचा गैरफायदा घेत वाळू माफियांकडून हा उपसा केला जात आहे.आसखेड बुद्रुक गावच्या हद्दीत मागील एक महिन्यापासून हा उपसा सुरू असून, आसखेड खुर्द गावच्या हद्दीत तीन दिवसांपूर्वी सुरुवात करण्यात आली आहे. या वाळूउपशामुळे येथे असणाऱ्या विहिरीला देखील धोका निर्माण झाला आहे. येथील शेतकऱ्यांच्या पाणीयोजना अडचणीत आल्या आहेत.

आसखेड खुर्द आणि आसखेड बुद्रुक या दोन गावादरम्यान पुणे जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाकडून जवळपास ७८ लाक्ख रुपये खर्च करून कोल्हापूर पध्दतीचा बंधारा उभारला जात आहे. परंतु, सध्या या भागांमध्ये वाळू माफियांकडून मोठ्या प्रमाणात बेकायदा वाळू उपसा सुरू आहे. त्यामुळे नदीपात्राची पूर्णपणे चाळण झाली असून, मोठ- मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असून, बंधाऱ्याचे काम करण्यात अडचण येत आहे. सध्या बंधाऱ्याचे काम मार्गी लागले नाही, तर अजून एक वर्ष नागरिकांना पाण्याची वाट पाहावी लागणार आहे. 

कोरोनाचे कारण देत महसूलचा कोणताही अधिकारी या प्रकाराकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे वास्तव आहे. येथून वाळूची मोठ्या प्रमाणात वाहने भरून नेले जात असल्याने गावठाणाअंतर्गत रस्त्याचे व शेतकऱ्यांच्या शेतीकडे जाणाऱ्या रस्त्याचे नुकसान झाले असून, याबाबत नागरिकांनी तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. महसूल विभाग किंवा संबंधित अधिकाऱ्यांनी तत्काळ या ठिकाणी सुरू असणारा बेकायदा वाळू उपसा थांबवावा, अशी मागणी दोन्ही गावातील नागरिकांनी केली आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Airport Rules: प्रवाशांना दिलासा! विमानतळावरील अतिरिक्त शुल्कांवर सरकारचा मोठा निर्णय; नियम लवकरच बदलणार?

Neeraj Chopra CWG26: नीरज चोप्राने पाकिस्तानी अर्शद नदीमवर कुरघोडी केली, पण ८४ मीटरचे पात्रता अंतर गाठण्यात अपयशी; फायनलमध्ये पोहोचला की नाही?

सलमान खानने विकला कोट्यवधींचा फ्लॅट; तरीही हातात पडला फक्त 'एवढाच' नफा!

Latest Marathi News Live Update : नागपूरमध्ये आज पुन्हा पावसाला सुरुवात

Mumbai News: आरामदायी गाड्यांवर महापालिकेची उधळपट्टी! पदाधिकाऱ्यांवरील २ कोटी १६ लाखांचा खर्च वाया, नव्या गाड्या सहा महिन्यांत आवडेनाशा

SCROLL FOR NEXT