पुणे

अनधिकृत कीऑक्स, होर्डिंग, फ्लेक्सवर पालिकेकडून कारवाई एका दिवसात १ लाख रुपये दंड ठोठावला

CD

अनधिकृत कीऑक्स, फ्लेक्सवरील
कारवाईमध्ये एक लाख रुपये दंड
पिंपरी, ता. १६ : शहरातील चौका चौकात अनधिकृत कीऑक्स, होर्डिंग, फ्लेक्स लावून विद्रुपीकरण करणाऱ्यांवर महापालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. पालिकेच्या आकाश चिन्ह परवाना विभागाच्या अतिक्रमण विभागाने शुक्रवारी (ता. १५) ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयात धडक कारवाई करून अनधिकृत साहित्य जमा करून एक लाख रुपयांचा दंड ठोठावला.
विनापरवाना कमानी उभारून जाहिरातबाजी करणाऱ्यांवर या विभागाने यापूर्वी थेट गुन्हे दाखल केले आहे. वाढदिवस, स्वागत समारंभ, उद्‍घाटन आदींच्या निमित्ताने चौका चौकात फ्लेक्स लावले जातात. यावर नियंत्रण राखण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. शुक्रवारी सकाळच्या सत्रात या विभागाने दोन जणांना एकूम एक लाख रुपयांचा दंड ठोठावला. दुपारच्या सत्रात ५६ झेंडे, २७ लाकडी फलक, ७ लोखंडी फ्रेम, १२० कीऑक्स जप्त करण्यात आली. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, आकाश चिन्ह परवाना विभागाचे सहआयुक्त मनोज लोणकर, उपायुक्त राजेश आगळे यांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात आली. यापुढे कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती आकाश चिन्ह परवाना निरीक्षक कालिदास शेळके यांनी दिली.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस उपपंतप्रधान होणार? संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, ‘मोदींचा वारसदार म्हणून...’

शरू खांद्यावर डोकं ठेवणार, तिच्या स्पर्शाने जय मोहरणार; दोघांची वाढती जवळीक पाहून प्रेक्षक खुश, सनई चौघडेचा नवा प्रोमो व्हायरल

मुळशी पॅटर्नमुळे मुलांना नोकरी मिळेना, लग्नही जुळेना? मुळशीकरांचा संताप; चित्रपटाचं नाव बदलण्याची मागणी

Marathi News Live Updates : गणेश उत्सवात डीजे वादनाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या विद्यानंद बापट यांना बेदम मारहाण

Mumbai Local: दिव्यांग व्यक्तीचा जीव धोक्यात घालणारा प्रकार, 'वॉकर'च्या मदतीने ओलांडली रेल्वे रूळ; Video Viral

SCROLL FOR NEXT