पुणे

बारामतीत बेवारस अवस्थेतील १५० वाहनांच्या लिलावाचा इशारा

CD

बारामती, ता. ५ : येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या परिसरासह इंदापूर, दौंड एसटी डेपो परिसरात व इतर ठिकाणी दीर्घकाळापासून जप्त व बेवारस अवस्थेत उभी असलेली वाहने संबंधितांनी दहा दिवसात ताब्यात न घेतल्यास त्याचा लिलाव केला जाणार आहे.
वाहन कर व इतर थकबाकी वसुलीच्या कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेली तसेच अनेक महिन्यांपासून कार्यालयाच्या आवारात उभी असलेली सुमारे १५० वाहने अद्याप संबंधितांनी ताब्यात घेतलेली नाहीत. या वाहनांबाबत वाहन मालक, चालक किंवा वित्तदात्यांनी तातडीने कार्यालयाशी संपर्क साधून आवश्यक कर व शुल्क भरून वाहने ताब्यात घ्यावीत.
दीर्घकाळ एकाच ठिकाणी उभी राहिल्यामुळे वाहनांचे नुकसान होण्याची, त्यांची किंमत कमी होण्याची तसेच इंधन गळतीसारख्या कारणांमुळे अपघाताचा धोका निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे लिलाव करण्यात येणार असून
लिलावातून मिळणारी रक्कम शासनाकडे जमा करण्यात येणार आहे.
वाहनांच्या जाहीर लिलावाबाबतची तारीख, वेळ व ठिकाणाची माहिती cauction.gov.in तसेच www.mstcecommerce.com⁠ या संकेतस्थळांवर आणि उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, बारामतीच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Update: MPSC चा मोठा निर्णय! 11 हजार जागांची वाढ; तलाठ्यांच्या किती जागा? परीक्षा कधी? नव्याने अर्ज कधी करता येणार?

Solapur Accident: सोलापूर-पुणे महामार्गावर काळाचा घाला! कंटेनरला कारची धडक; आजी-आजोबा, सून अन् नातवाचा मृत्यू

Nashik Road Accident: रस्त्याचे काम सुरू असताना सुरक्षेकडे दुर्लक्ष; खोल खड्ड्यात ट्रॅक्टर पलटी, १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Pune Crime: ओतूर पोलिसांचा दुचाकी चोरट्यांना दणका! तीन आरोपी अटकेत; पाच लाखांच्या नऊ मोटारसायकली जप्त

Beed Crime: फेसबुकवरील साड्यांच्या जाहिरातीचा सायबर सापळा; ८.६४ लाखांची फसवणूक, दोन लाख रुपये होल्ड

SCROLL FOR NEXT