Crime_Stabbing 
पुणे

पुणे : ५० रुपयांसाठी मामा उठला भाच्याच्या जीवावर; दारुसाठी पैसे न दिल्याने केले चाकूने वार

सकाळ वृत्तसेवा

पुणे : मामा आणि भाच्यामधील नातेसंबंधाबाबतच्या अनेक गोष्टी, घटना आपण ऐकतो. बहुतांशवेळी त्यातून या दोघांमधील प्रेम व्यक्त झाल्याचेच दिसून येते. मात्र, येरवड्यात घडलेल्या एका घटनेत मामा अवघ्या 50 रुपयांसाठी आपल्या भाच्याच्या जीवावर उठल्याचे दिसून आले. भाच्याने मामाला दारू पिण्यासाठी पन्नास रुपये न दिल्याच्या रागातून मामाने आपल्या भाच्याच्या गळ्यावर चाकूने वार केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी (ता.31) येरवड्यात घडला. या घटनेत गंभीर जखमी झालेला भाचा रुग्णालयात उपचार घेत आहे. 

येरवड्यातील भाजी मार्केट परिसरात राहणाऱ्या 38 वर्षीय शांताराम धोंडीबा पवार याचा त्याच वस्तीत राहणारा राजू भारत डोंगरे (वय 33) हा सख्खा भाचा आहे. ते दोघेही येरवड्यामध्येच राहतात. राजू डोंगरे हा मदर तेरेसा आश्रमामध्ये सुरक्षा रक्षक आहे. तर पवार हा बांधकाम प्रकल्पावर सेंट्रींगची कामे करतो. पवार यास दारुचे व्यसन आहे. दरम्यान, शनिवारी रात्री पवार हा त्याचा भाचा राजूच्या घरी गेला. त्याने तेथे जाऊन राजूकडे दारू पिण्यासाठी 50 रुपयांची मागणी केली. परंतु राजूने त्यास स्पष्टपणे नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या मामाने राजूला शिवीगाळ आणि मारहाण केली. राजूच्या पत्नीने दोघांमधील भांडणे सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र पवारने तिलाही शिवीगाळ केली. यानंतर पवारने त्याच्या घरात शिरुन भाजी चिरण्यासाठी वापरण्यात येणारा चाकू बाहेर आणला. त्याच चाकूने राजूच्या गळ्यावर आणि पोटावर सपासप वार केले. 

या घटनेमध्ये राजू गंभीर जखमी झाला. त्यामुळे घाबरुन पवारने तेथून पळ काढला. दरम्यान राजूचे कुटुंबीय आणि स्थानिक नागरिकांनी राजूला उपचारांसाठी तत्काळ खासगी रुग्णालयामध्ये दाखल केले. या घटनेची माहिती काही वेळातच येरवडा परिसरात पोचल्याने चांगलीच खळबळ उडाली. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक समीर करपे करीत आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DMart मध्ये खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना! हे नियम माहिती नसतील तर नुकसान होऊ शकते, खरेदीपूर्वी नक्की वाचा!

Kolhapur Police Recruitment : कोल्हापुरात पोलिस भरतीसाठी लेखी परीक्षा उद्या; ८८ पदांसाठी ११३५ उमेदवार मैदानात

Multibagger Stock: ₹11 चा शेअर थेट ₹1100 वर! 1 लाखाचे झाले तब्बल 1 कोटी 10 लाख; 5 वर्षांत गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update : कल्याणमध्ये चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या; ९ वर्षांच्या मुलासमोर घडली धक्कादायक घटना

Kolhapur Water Project : ‘धामणी’चे अतिरिक्त पाणी करवीर तालुक्याला द्यावे; तर, कोल्हापूरला पोलिस आयुक्तालय हवे - नरके

SCROLL FOR NEXT