इंद्रायणीनगर, भोसरी - संजय वाबळे यांच्या संपर्क कार्यालयात नागरिकांद्वारे जमा करण्यात आलेले दूषित पाण्याचे नमुने. 
पुणे

इंद्रायणीनगरातील पाणी पिण्यास अयोग्य

संजय बेंडे

भोसरी - येथील इंद्रायणीनगरातील पेठ क्रमांक दोनमध्ये व समर्थ कॉलनीत येणारे पाणी पिण्यास अयोग्य आहे, असा अहवाल जलशुद्धीकरण प्रकल्पाद्वारे प्राप्त झाल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली. स्वच्छ पाणीपुरवठा न केल्यास पालिका आयुक्त व संबंधित अधिकाऱ्यांना हे पाणी पिण्यास भेट देत आंदोलनाचा इशारा स्वीकृत सदस्य संजय वाबळे यांनी दिला आहे.

पेठ क्रमांक दोनमधील स्कीम क्रमांक अकराशे वीस (घरांची संख्या) आणि समर्थ कॉलनीमधील सुमारे शंभर बंगल्यांसह आदी भागात गेल्या पंधरा दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत आहे, अशा तक्रारी आल्याने वाबळे यांनी तक्रारदारांच्या घरी भेट देऊन पाण्याचे नमुने गोळा केले व ते तपासणीसाठी जलशुद्धीकरण प्रकल्पाकडे पाठविले होते. त्याचा अहवाल सोमवारी (ता. ११) प्राप्त झाला. त्यामध्ये म्हटले आहे, की हे पाणी पिण्यास योग्य नाही. त्यामध्ये कोलिफॉर्म या जीवाणूंचे प्रमाण शंभर मिलिलिटरमध्ये अठरा मिलिलिटरपेक्षा अधिक आढळल्याने हे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल देण्यात आला. असाच दूषित पाणीपुरवठा बालाजीनगर झोपडपट्टी, चक्रपाणी वसाहत, दिघी परिसरातील काही भागांमध्येही होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. या भागामध्ये पाण्याची पाइपलाइन व सांडपाणी वाहिनीचे काम सुरू असल्याने नादुरुस्त पाइपलाइनमधून हा दूषित पाणीपुरवठा होण्याची शक्‍यता अभियंता रवींद्र पवार यांनी वर्तविली आहे. 

आजार बळावण्याची शक्‍यता
कोलिफॉर्म जीवाणूंमुळे जुलाब व उलट्या होऊ शकतात. त्याचप्रमाणे पोटाचे आजारही बळावू शकतात. लहान मुलांची प्रतिकारशक्ती कमी असल्याचे त्यांना अशा दूषित पाण्याचा अधिक त्रास होऊ शकतो, असे भोसरी रुग्णालयाचे ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

संबंधित भागातील पाण्याच्या पाइपलाइनचे दररोज वॉशआउट करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे दोन दिवसांत या भागातील जुन्या पाइपलाइनवरचे नळजोड नव्या पाइपलाइनमधून देण्यात येणार असल्याने ही समस्या दूर होईल.
- रवींद्र पवार, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL, Video: CSK विरुद्ध RCB चा सामना विराट कोहलीला सर्वात जास्त का आवडतो? म्हणाला, 'त्यांचे फॅन्स बंगळुरूत....'

Solapur : काँग्रेससह शरद पवारांना धक्का; भगीरथ भालके, अनिल सावंत शिवसेनेच्या वाटेवर; DyCM शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेशाची शक्यता

सत्ताधारी पक्षाचा नेता तरुणीसोबत नको त्या अवस्थेत; सापडताच कुठे पळू झालं? शेतातून....

Solapur Ambedkar Jayanti: बुद्धिजीवी भीमप्रेमींना साेलापूरात हवीय एकत्रित मिरवणूक; डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव, मध्यवर्तीचा बुधवारी होणार निर्णय!

Latest Marathi News Live Update : टोलानी कॉलेजमध्ये विद्यार्थ्याचा मृत्यू, इतर विद्यार्थी आक्रमक; प्राचार्याच्या निलंबनाची मागणी

SCROLL FOR NEXT