पुणे

कारवाई कागदावर; अनधिकृत जाहिरातबाजी ढीगभर

CD

पिंपळे गुरव, ता. १० ः नवी सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागरमधील प्रमुख चौकांमध्ये अनधिकृत फ्लेक्सबाजी मोठ्या प्रमाणावर वाढली असून ‘जिथे जागा दिसेल, तिथे फ्लेक्स’ अशी स्पर्धाच जणू सुरू झाल्याचे दिसून येत आहे. त्याने वाहतुकीला अडथळे निर्माण होणे, चौकांतील सिग्नल, सूचनाफलक झाकले जाणे, तसेच नागरिकांच्या सुरक्षेवर परिणाम होणे यांसारख्या गंभीर समस्या वाढत आहेत.
प्रत्येक चौकात वाढत्या जाहिरातींमुळे निर्माण झालेला बकालपणा भयावह असून ‘फुकटची जाहिरातबाजी’ शहराच्या सौंदर्यात बाधा उत्पन्न करत आहे. चौकांतील पदपथ, सिग्नल, विजेचे खांब, गल्ल्यांचे दिशासूचक फलक अशी कुठलीही जागा सोडण्यात आलेली नाही. आश्चर्याची बाब म्हणजे महानगरपालिका अनेकवेळा अनधिकृत बॅनर, पोस्टर, फ्लेक्सबाजी विरोधात मोहीम राबवित असली तरी ती बहुधा तक्रार आल्यानंतरच सुरू होत आहे. अन्यथा मौन बाळगले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
कागदोपत्री मोहीम न राबवता महापालिकेने प्रभावी आणि सातत्यपूर्ण मोहीम राबवावी. प्रत्यक्षात गस्त वाढवून ही अनधिकृत फ्लेक्सबाजी रोखावी, पर्यावरण आणि शहर सौंदर्याला बाधा आणणाऱ्यांवर त्वरीत दंडात्मक कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. नियमांचे पालन करून शहर स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी फक्त नागरिकांची नव्हे, तर संबंधित सर्व प्रशासकीय यंत्रणांची असल्याचा सूर परिसरात उमटताना दिसतो आहे.

अनधिकृत फ्लेक्स कुठे ?
फेमस चौक, साई चौक, कृष्णा चौक, क्रांती चौक, एस. काटे चौक, काटेपुरम चौक, राजमाता जिजाऊ उद्यान परिसर, महाराष्ट्र बँक चौक, संविधान चौक,पी.के. चौक स्वराज गार्डन चौक आदी सर्व महत्त्वाच्या ठिकाणी, गल्ल्या, नामफलक, विजेचे खांब ते ओपन जीम.


नियम धाब्यावर
- खांबांपासून गल्ली फलकांपर्यंत जागोजागी बॅनर
- पदपथ, सिग्नल झाकून वाहतुकीला अडथळे
- सुरक्षेचा प्रश्न गंभीर, नियम धाब्यावर
- पर्यावरण, शहर सौंदर्यावर परिणाम
- प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह


अनधिकृत फ्लेक्सविरोधात महानगरपालिकेकडून नियमितपणे कारवाई केली जात आहे. संबंधित भागांतील वॉर्ड अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी, अतिक्रमण निर्मूलन विभाग तसेच आकाशचिन्ह विभागाचे निरीक्षक यांच्या समन्वयातून ही मोहीम राबवली जाते. नियमांचे उल्लंघन आढळल्यास तत्काळ दंडात्मक कारवाई करण्यात येते तसेच आवश्यकतेनुसार पोलिस तक्रारही दाखल केली जाते. आतापर्यंत सुमारे ३० लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
- राजेश आगळे, उपायुक्त, आकाशचिन्ह परवाना विभाग

अनधिकृत फ्लेक्स काढण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आलेल्या आहेत. लवकरच सर्व अनधिकृत फ्लेक्स काढण्यात येतील.
- अश्विनी गायकवाड, ‘ड’ क्षेत्रीय अधिकारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका


अनधिकृत फ्लेक्सबाजीमुळे चौकांचे विद्रूपीकरण होत असून वाहतुकीलाही अडथळे निर्माण होत आहेत. प्रशासनाने नियमित कारवाई करून जबाबदारा व्यक्तींवर कडक दंड लावावा आणि ही समस्या थांबवावी.
- शंतनू डोळस, स्थानिक नागरिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"प्रिंट खूप बारीक फॉन्टमध्ये होती, वाचन करताना चूक घडली..."; राहुल नार्वेकरांची मराठी वाचन चुकांवर सभागृहात माफी

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे नालासोपारा पूर्वेतील तुळींज पोलीस ठाण्यातही पाणी साचले

Mumbai Rain: वेस्टर्न एक्सप्रेस वेवर खड्डेच खड्डे, पावसाने पोलखोल; वाहतूक धीम्या गतीने, वाहनांच्या रांगा

युवराज सिंगसोबत 'रणजी' खेळलेल्या सत्तूचा एन्काउंटर, क्रिकेटपटू कसा बनला गुन्हेगार?

Kolhapur Former Mayor Grandson Death : कोल्हापूरचे माजी महापौरांच्या नातवाने उचलले टोकाचं पाऊल, नुकतीच नीट परिक्षा दिल्याची माहिती समोर

SCROLL FOR NEXT