पुणे

उंडाळे. कै. सो. सुमनदेवी जयसिंगराव पाटील स्मृती शारदीय व्याख्यानमाला सोमवार पासून प्रांरभ

CD

उंडाळेत उद्यापासून शारदीय व्‍याख्‍यानमाला

उंडाळे, ता. १० : येथील सुमनदेवी जयसिंगराव पाटील स्मृती शारदीय व्याख्यानमालेस सोमवारपासून (ता. १२) प्रारंभ होत असल्याची माहिती प्राचार्य जे. एस. माळी यांनी दिली. यावर्षी व्याख्यानमालेचे रौप्यमहोत्सवी वर्ष असून, कवी नितीन चंदनशिवे, लेखिका डॉ. सुनीता बोर्डे खडसे आणि साहित्यिक प्रशांत मोरे यासह मान्यवर व्याख्यात्यांची व्याख्याने होणार आहेत.
उंडाळे हायस्कूलमध्ये होणाऱ्या व्याख्यानमालेचे उद्‌घाटन पाटणचे प्रांताधिकारी सोपान टोंपे यांच्या हस्ते व घोगावच्‍या संतकृपा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली, कऱ्हाडच्‍या पोलिस उपअधीक्षक राजश्री पाटील, संस्थेचे अध्यक्ष ॲड. आनंदराव पाटील, सचिव बी. आर. यादव, माजी सरपंच दादासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी सकाळी साडेदहा वाजता होणार आहे. यावेळी ठाणेतील साहित्यिक प्रशांत मोरे यांचे ‘आई तुझा हात परीस’ या विषयावर व्याख्यान होईल. मंगळवारी मानसोपचारतज्ज्ञ डॉ. जयानंद नलवडे यांचे ‘चला जिंकूया मनाला’, बुधवारी (ता. १४) लेखिका डॉ. सुनीता बोर्डे- खडसे यांचे ‘फिंद्री- एका मुलीच्या जिद्दीची अनोखी कथा’, गुरुवारी हेमंत रकटे यांचा ‘महाराष्ट्राची लोकधारा’ हा कार्यक्रम होईल. शुक्रवारी (ता. १६) नितीन चंदनशिवे यांच्या ‘जावे कवितेच्या गावा’ या विषयावरील व्याख्यानाने व्याख्यानमालेचा समारोप होईल. समारोप समारंभ ॲड. आनंदराव पाटील यांच्‍या अध्‍यक्षतेखाली आणि कऱ्हाडचे प्रांताधिकारी अतुल म्‍हेत्रे यांच्‍या प्रमुख उपस्‍थितीत होणार आहे. या वेळी संस्थेचे निरीक्षक बी. आर. पाटील, बादशाह शेख आदी उपस्थित राहणार आहेत.

..............................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''जमेल तसे जंतरमंतरवर या, पोलिसांनी अडवल तर...''; आंदोलनाची सूत्रे हाती घेताच अजिंक्य शिंदेची प्रतिक्रिया

Aashna Choudhary IPS Success Story : कोणतीही कोचिंग नाही, तरीही मारली बाजी! यूपीएससीच्या प्रवासात चुका सुधारत कशी बनली तरुणी आयपीएस अधिकारी?

Ratnagiri Water: रत्नागिरीत दर सोमवारी पाणी बंद; नगरपालिकेचा निर्णय; रोजच्या पुरवठ्यात १५ मिनिटे कपात

Marathi News Live Updates : अभिजीत दीपकेंना आजीच्या अंत्यसंस्कारासाठी जाण्याची परवानगी

भाच्याच्या किडन्या निकामी, हॉस्पिटलला जाताना मामाला पोलिसांनी उचललं; ३० वर्षे देशसेवा, कागदपत्रेही दाखवली

SCROLL FOR NEXT