Undeclared order to PMP Conductor About not Bringing ten rupees coin in the treasury
Undeclared order to PMP Conductor About not Bringing ten rupees coin in the treasury 
पुणे

दहाची नाणी कोशागारात नको; पीएमपीचा वाहकांना अलिखित आदेश

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) प्रशासनाने वाहकांना जास्त प्रमाणात दहा रुपयांची नाणी कोशागारात जमा करू नका, असे सांगितले आहे. मात्र, पीएमपीच्या या अलिखित आदेशामुळे वाहक कोंडीत सापडले आहेत. वाहकांनी प्रवाशांकडून दहाची नाणी स्वीकारण्यास नकार दिल्यास वादाच्या घटना घडत आहेत.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा  

तिकिटापोटी जमा होणारी रक्कम बँकेत जमा केली जाते. या बँकेने दहाची नाणी कमी प्रमाणात जमा करण्याबाबत कळविले आहे. त्यामुळे पीएमपीने देखील त्यांच्या वाहकांना दहाची नाणी कोशागारात आणू नका, बाहेरच्या बाहेरच व्यवहारात आणा, असे सांगितले आहे. यामुळे प्रवासादरम्यान प्रवाशाने दहाचे नाणे दिल्यास वाहक ते स्वीकारत नाहीत. त्यावेळी नाणे का घेत नाही, यावरून त्यांच्यात वाद होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. इतर ठिकाणी दहाचे नाणे चलनात असताना पीएमपीचे वाहक हे नाणे का घेत नाहीत, असा प्रश्‍न प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. नाणी न घेण्याबाबत लेखी आदेश दाखवा, अशी मागणी प्रवासी करतात. अशावेळी नेमके काय करावे, असा प्रश्‍न वाहकांपुढे उभा ठाकत आहे. 

''प्रवाशांकडून दहाची नाणी स्वीकारू नयेत, असे सांगण्यात आलेले नाही. केवळ कमी प्रमाणात दहाची नाणी आगाराच्या कोशागारात जमा करण्याबाबत वाहकांना तोंडी सूचना दिल्या आहेत.'' 
- सतीश गव्हाणे, आगार व्यवस्थापक, निगडी  

पुणे : मिळकतकर भरा, नाहीतर, घरासमोर वाजणार बँड 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Dravid India coach : राहुल द्रविडनंतर कोण होणार टीम इंडियाचा कोच...? बीसीसीआयसमोर आहेत 'ही' तगडी नावं

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांची तिहार तुरुंगातून सुटका, 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन

Fact Check: लालकृष्ण अडवाणी राहुल गांधींना 'भारतीय राजकारणातील हिरो' म्हटले नाहीत, फेक पोस्ट व्हायरल

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंमुळे गोविंदाची उडाली तारांबळ; 20 मिनिटं हॉटेलबाहेर ताटकळत उभं राहावं लागलं

Brij Bhushan Singh : ब्रिजभूषण सिंह विरोधात सबळ पुरावे हाती! कोर्टाकडून आरोप निश्चित करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT