डेक्कन जिमखाना क्लब ः बास्केटबॉल कोर्टवर सुरू असलेल्या एकोणीस वर्षांखालील मुलांच्या गटाच्या शालेय बास्केटबॉल स्पर्धेत गुरुनानक स्कूल आणि डॉन बॉस्को स्कूल यांच्यात झालेल्या सामन्यातील एक चुरशीचा क्षण.
-----------
गुरुनानक, स. प. कॉलेज, नेस वाडिया, अमानोरा, फग्युर्सनची आगेकूच कायम
पुणे, ता. २० ः शिक्षण विभाग पुणे महानगरपालिका व जिल्हा क्रीडा परिषद पुणे आयोजित एकोणीस वर्षांखालील मुलांच्या गटाच्या शालेय बास्केटबॉल स्पर्धेत गुरुनानक, डॉ. कलमाडी श्यामराव स्कूल, स. प. कॉलेज, नेस वाडिया, अमानोरा स्कूल, फग्युर्सन कॉलेजने आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळविले.
डेक्कन जिमखाना क्लबच्या बास्केटबॉल कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत आर्यन परमारच्या खेळाने (१० गुण) गुरूनानक संघाने डॉन बॉस्को स्कूलचा १६-५ असा पराभव केला.
डॉ. कलमाडी श्यामराव स्कूलने मिलेनियम नॅशनल स्कूलचा २४-९ असा पराभव केला. या वेळी विजयी संगाकडून ईशान यादव (८ गुण), ईशान गाडगीळ (६ गुण), तर पराभूत संघाकडून आराध्य बचुटेने (६ गुण) सुरेख खेळ केला.
राजविर जगतापच्या (१३ गुण) सुरेख खेळाच्या जोरावर स. प. कॉलेजने माईर्स विश्वशांती गुरुकुल स्कूलला २०-१६ असे चार गुणांनी हरविले. यावेळी पराभूत संघाच्या आर्यन जाधव व ध्रुव प्रजापतीने (प्रत्येकी ६ गुण) केलेली खेळी अपुरी पडली.
दीपक काळे (७ गुण) व नईम शेखच्या खेळाने नेस वाडिया कॉलेजने जेएससीएससी कॉलेजवर १७-२ असा पंधरा गुणांनी विजय मिळविला.
हडपसरच्या अमानोरा स्कूलने विखे पाटील मेमोरिअल स्कूलचा ३४-३१ असा तीन गुणांनी पराभव केला. या वेळी विजयी संघाकडून गिनीत सोनी (११ गुण) व युवित जैन (९ गुण) तर पराभूत संघाकडून सत्यजित एम नरेशने (१८ गुण) चांगला खेळ केला.
शुभंकर थालचिम (१० गुण) व सोहम नलावडेच्या (६ गुण) खेळाने फग्युर्सन कॉलेजने दिल्ली पब्लिक स्कूलचा २८-२६ असा दोन गुणांनी पराभव केला. या वेळी पराभूत संघाकडून निश शहाने (१९ गुण) केलेली खेळी एकाकी ठरली.
---------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.