ECHS 
पुणे

ईसीएचएस अंतर्गत आता दिव्यांग मुले 25 वर्षानंतरही वैद्यकीय सुविधेसाठी पात्र

अक्षता पवार

पुणे - लष्करातील जवानांची मुले ज्यांचे वय 25 वर्षाहून जास्त आहे तसेच ते अविवाहित व कायमस्वरूपी अपंग आहेत अश्या मुलांना माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजनेच्या (ईसीएचएस) अंतर्गत वैद्यकीय लाभ मिळणार आहे. याबाबतचे परिपत्रक नुकतेच संरक्षण मंत्रालयाच्या तर्फे जाहीर करण्यात आले आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आतापर्यंत अविवाहित, कायमस्वरुपी अपंग आणि आर्थिकदृष्ट्या परावलंबी तसेच ज्यांच्या वयाची २५ वर्षे पूर्ण झाली अशा सैनिकांच्या मुलांना ईसीएचएस लाभार्थी व त्यांना ईसीएचएस अंतर्गत वैद्यकीय सुविधा मिळण्यास पात्र समजण्यात येत नव्हते. ही नियमावली केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेनुसार (सीजीएचएस) काढण्यात आली होती व सध्या याच नियमावलींचे पालन केले जात आहे.

मात्र वयाच्या 25 वर्षानंतर कुठल्याही घटनेमुळे माजी सैनिकाच्या मुलाला कोणत्याही प्रकारे अपंगत्व आले तर अशी वैद्यकीय सुविधा मिळण्यास अडचणी येऊ नयेत या हेतूने ही सुविधा देण्यात आली आहे. याबाबत संरक्षण मंत्रालय आणि माजी सैनिक कल्याण विभागाने सीजीएचएस लाभार्थ्यांचे पुत्र ज्यांना वयाच्या 25 वर्षानंतर दिव्यांगत्व आले आहे, आणि ते आपल्या वडिलांवर अवलंबून आहेत अश्या मुलांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरविण्यात आले आहे.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Old Monkच्या चाहत्यांनो सावधान! ७ वर्ष जुन्या दाव्यावर कंपनीची माघार, बाटलीचा लेबल बदलणार

Manoj Jarange Patil : जरांगेंचा ‘चलो मुंबई’ नारा! मराठा बांधव मुंबईकडे कूच करण्यासाठी सज्ज

OBC Mahamorcha : ओबीसी समाजाची मोठी तयारी! १ सप्टेंबरला पाटसहून महामोर्चा

फेक नॅरेटिव्हचा आरोप, राहुल गांधींवर निशाणा अन् CJPचा नवा अर्थ; फडणवीसांच्या भाषणात काय काय?

Hockey: भारत आठव्या स्थानावर राहिल्याने हॉकी इंडियाचे अध्यक्ष नाराज; विश्वचषकातील कामगिरीवर दिलीप तिर्की म्हणाले, “मीही खूश नाही”

SCROLL FOR NEXT