Fraud Sakal
पुणे

सदनिका भाड्याने घेण्याच्या बहाण्याने महिलेस घातला दिड लाख रुपयांना गंडा

लष्करामध्ये अधिकारी असल्याचे सांगत सदनिका भाडेतत्वावर घेण्याचा बहाणा करून अनोळखी व्यक्तीने महिलेला पावणे दोन लाख रुपयांना गंडा घातला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - लष्करामध्ये अधिकारी असल्याचे सांगत सदनिका भाडेतत्वावर (Flat Renting) घेण्याचा बहाणा करून अनोळखी व्यक्तीने महिलेला (Women) पावणे दोन लाख रुपयांना गंडा (Fraud) घातला. याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्तींविरुदाध फसवणूकीचा (Cheating) गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. (Under Pretext of Renting a Flat woman was Robbed of Rs 1.5 Lakh)

याप्रकरणी कल्याणीनगर येथे राहणाऱ्या 63 वर्षीय महिलेने फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी महिला एका खासगी कंपनीत नोकरीला आहे. त्यांची पिंपरी-चिंचवडमधील रहाटणी येथे एक सदनिका आहे. सदनिका मोकळी असल्याने भाडेकरू मिळण्यासाठी त्यांनी नो ब्रोकर डॉट कॉम या संकेतस्थळावर त्याबाबतची सविस्तर जाहिरात दिली होती. त्यावेळी फिर्यादीस एका अनोळखी व्यक्तीने फोन केला. आपण लष्करी अधिकारी असून आम्हाला तुमची सदनिका आवडली आहे. संबंधीत सदनिका भाडेतत्वावर घेण्यास आम्ही तयार असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर त्यांच्यात दरमहा 14 हजार रुपये भाडे देण्याचे त्यांच्यात निश्‍चित झाले.

फिर्यादीचा विश्‍वास प्राप्त केल्यानंतर संबंधीत अनोळखी व्यक्तीने भाड्याची रक्कम फिर्यादी महिलेच्या बॅंक खात्यावर जमा करण्याचा बहाणा केला. त्यानंतर त्याने गुगल पे व पेटीएमद्वारे फिर्यादी व त्यांच्या मुलाला वेळोवेळी क्‍युआर कोड पाठविले, संबंधीत क्‍युआर कोड तो स्कॅन करण्यास सांगत होता. त्यानुसार, फिर्यादी यांनी क्‍युआर कोड स्कॅन केले. त्यावेळी त्यांच्या बॅंक खात्यातील एक लाख एक लाख 65 हजार रुपये अनोळखी व्यक्तीने काढून घेतल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तसेच स्वतःचे पावणे दोन लाख रुपये गुंतवूनही भाडेकरू राहण्यास न आल्याने, तसेच त्याने पैसे न पाठविल्याने फिर्यादीस संशय आला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) अजय वाघमारे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT