पुणे

स्पर्शातून नाही, गैरसमजांतून वाढते रुग्णांची वेदना

CD

जागतिक व्हिटिलिगो दिन
पुणे, ता. २४ : शरीरावर पांढरे डाग पडणे म्हणजेच ‘कोड फुटणे’ (व्हिटिलिगो) हा संसर्गजन्य आजार नसून, तो स्पर्श, अन्न किंवा सहवासातून पसरत नाही. मात्र, या रुग्‍णांना सामाजिक भेदभावाचा सामना करावा लागतो. म्‍हणून तज्ज्ञांनी या आजाराबाबतचे सामाजिक गैरसमज दूर करण्याचे आवाहन केले आहे.
जून महिन्‍याचा तिसरा गुरुवार (ता. २५) हा ‘जागतिक व्हिटिलिगो’ दिन पाळण्यात येतो. त्वचेला रंग देणाऱ्या ‘मेलानोसाइट्स’ पेशींची संख्या कमी होते किंवा नष्ट झाल्यामुळे शरीरावर पांढरे डाग दिसू लागतात. आनुवंशिकता, स्वयं-प्रतिकार विकार, अतिप्रमाणातील ताणतणाव आणि पर्यावरणीय घटक या आजारासाठी कारणीभूत ठरतात. जगभरातील सुमारे ०.५ ते १ टक्के लोकसंख्या या आजाराने प्रभावित आहे. हा आजार कोणत्याही प्रकारे संसर्गजन्य नसल्याचे वैद्यकीय क्षेत्रातून वारंवार स्पष्ट करण्यात आले आहे.
त्वचारोगतज्ज्ञांच्या मते, ‘कोड फुटणे’ यावर आता प्रभावी उपचार उपलब्ध आहेत. आजाराच्या सुरुवातीच्या टप्प्यात औषधोपचार, फोटोथेरपी आणि काही प्रगत उपचारांद्वारे, तसेच शस्त्रक्रियेद्वारे डाग कमी करता येतात. मात्र, अनेकदा रुग्ण उपचारांऐवजी घरगुती उपाय किंवा चुकीच्या माहितीला बळी पडतात. योग्य वेळी तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास आजारावर नियंत्रण मिळवणे शक्य होते.

रुग्णांना मानसिक त्रास
शारीरिक त्रासापेक्षा या रुग्णांना मानसिक तणाव आणि सामाजिक भेदभावाचा अधिक सामना करावा लागतो. समाजात असलेल्या चुकीच्या समजुतींमुळे रुग्णांना न्यूनगंड जाणवतो. कारण हा आजार स्‍पर्शातून पसरतो, असा गैरसमज असतो.

अशी ओळखा सुरुवातीची लक्षणे
- अभ्यासानुसार, ‘व्हिटिलिगो’च्‍या सुमारे ५० टक्‍के प्रकरणांची सुरुवात २० वर्षांपूर्वी होते.
- ‘व्हिटिलिगो’ची सुरुवात त्वचेवर दिसणाऱ्या लहान, दुधासारख्या पांढऱ्या डागांपासून होते.
- डाग प्रामुख्याने डोळ्यांभोवती, तोंडाभोवती, बोटांवर, कोपरांवर, गुडघ्यांवर, हात-पायांवर किंवा वारंवार घर्षण होणाऱ्या भागांवर दिसू लागतात.
- केस, भुवया, पापण्या किंवा तोंडाच्या आतील भागातील त्वचाही पांढरी होऊ लागते.
- हे डाग सहसा दुखत नाहीत, खाज येत नाही किंवा त्यावर खवलेही नसतात, त्यामुळे सुरुवातीला त्यांच्याकडे दुर्लक्ष होऊ शकते.

त्वचेवर दिसणारा प्रत्येक पांढरा किंवा फिकट डाग हा ‘व्हिटिलिगो’ असतो असेही नाही. पिटिरायसिस अल्बा, बुरशीजन्य संसर्ग, त्वचेवरील जुन्या जखमा किंवा दाहनंतर निर्माण झालेले रंगबदल, तसेच काही जन्मखुणा यांमुळेही त्वचेवर फिकट डाग दिसू शकतात. ‘व्हिटिलिगो’च्या अचूक निदानासाठी त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. योग्य उपचार, भावनिक आधार आणि कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे ‘व्हिटिलिगो’ असलेले रुग्‍ण निरोगी आयुष्‍य जगू शकतात.
- डॉ. झील अंबिके, त्वचारोगतज्ज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT