Undri Pisoli Odha Sakal
पुणे

साहेब... उंड्री-पिसोळीतील ओढा पाहण्यासाठी दुर्बिन देता का दुर्बिन

ओढा पाहण्यासाठी दुर्बिन देता का दुर्बिन असा टाहो हवेली तालुक्यातील ग्रामस्थांकडून केला जात आहे.

अशोक बालगुडे

ओढा पाहण्यासाठी दुर्बिन देता का दुर्बिन असा टाहो हवेली तालुक्यातील ग्रामस्थांकडून केला जात आहे.

उंड्री - ओढा (Odha) पाहण्यासाठी दुर्बिन देता का दुर्बिन (Binoculars) असा टाहो हवेली तालुक्यातील ग्रामस्थांकडून केला जात आहे. ओढा रुंदीकरण आणि खोलीकरणाचा उपक्रम शासनाकडून (Government) राबविला जात आहे, तर दुसरीकडे बांधकाम व्यावसायिकांकडून ओढा गिळंकृत करण्याची स्पर्धाच सुरू झाल्याचे चित्र उपनगर आणि लगतच्या गावात दिसत आहे. गावातील ओढे फक्त चित्रात पाहावे लागतील, अशी टिपण्णी उंड्री ग्रामस्थांनी दिली.

कात्रज बायपास रस्त्यावरील उंड्रीपासून उगम पावलेला ओढा अमित कलरी, बिशप स्कूल, कडनगर चौक मार्गे महंमदवाडी असा ३३ फूट रुंद आणि साडेतीन किमी लांबीचा आहे. या ओढ्यावर ठिकठिकाणी अतिक्रमण झाले आहे. मात्र, बिशप स्कूलने चक्क ओढ्यात सिमेंटचे पाईप टाकून त्यावर बांधकाम केल्याने पावसाचे पाणी गेल्या वर्षी क्रोम सोसायटी आणि नाल्यालगत असलेल्या नागिरकांच्या घरामध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले होते. बिशप स्कूलने बंद केलेला ओढा कधी खुला करणार का असा सवालही विजय कड, शंकर कवडे, विजय चौधरी नागरिकांनी उपस्थित केला आहे.

ग्रामस्थ अल्लाबक्ष शेख, अविनाश टकले, राजेंद्र भिंताडे म्हणाले की, तब्बल ३३ फूट रुंदीच्या ओढ्यावर बांधकाम करून पाणी जाण्यासाठी अवघ्या दोन-तीन फुटी सिमेंट पाईप टाकल्याने नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते. यावेळी पालिका अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून कारवाई केली जाईल, असे सांगितले होते. मात्र, अद्याप कोणतीही कारवाई का केली नाही, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, पालिकेच्या बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंत्यांनी सांगितले की, उंड्रीतील ओढ्यावर अतिक्रमण करणाऱ्यांना नोटीस दिली आहे. बिशप स्कूलने ओढा खुला करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुमचा पुलवामा हल्ल्याशी संबंध, मुंबईत २१ वर्षीय तरुणीला डिजिटल अरेस्ट करत ३२ लाखांना गंडा; क्रिकेटरसह ७ जणांना अटक

Latest Marathi News Live Update : नागपूर रेल्वे स्थानकावरील प्लॅट फॉर्म क्रमांक 2 पुढील 52 दिवस राहणार बंद; मध्य रेल्वेचा निर्णय

Iran Israel Conflict: इराणला शस्त्रसंधी अमान्य, मध्यस्थांचा प्रस्ताव फेटाळला; अमेरिकेन तळांना केलं टार्गेट!

Jalna News: बसथांब्याच्या दयनीय अवस्थेमुळे प्रवाशांचे होताहेत हाल; जालना-वडिगोद्री महामार्गावरील प्रकार; उघड्यावरच करावी लागते बसची प्रतीक्षा

Ashok Kharat: दुनिया झुकती है, बस झुकानेवाला चाहिए...; भोंदू अशोक खरातच्या चौकशीत धक्कादायक खुलासा! काळ्या कारनाम्याचे गुपित उघड

SCROLL FOR NEXT