हांडेवाडी रोडवरील वाहतूक कोंडीने वाहनचालकांची घुसमट sakal
पुणे

उंड्री : हांडेवाडी रोडवरील वाहतूक कोंडीने वाहनचालकांची घुसमट

पालिका प्रशासानने ड्रेनेजचे काम तातडीने मार्गी लावावे

सकाळ वृत्तसेवा

उंड्री : हांडेवाडी रोडवरील मगर पेट्रोल पंप ते चिंतामणीनगर दरम्यान ड्रेनेजलाईनचे काम सुरू असून, विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांमुळे वाहतूककोंडी आणि ध्वनी व वायूप्रदूषणाने स्थानिकांसह वाहनचालकांची घुसमट होत आहे. पालिका प्रशासनाने ड्रेनेज लाईनचे काम तातडीने करून रस्त्याचे डांबरीकरण करावे, असे मागणी खंडेराव जगताप यांनी केली आहे.

अमित घुले म्हणाले की, वाहतूक पोलिसांनी ड्रेनेज लाईनचे काम सुरू असल्यामुळे मोठ्या वाहनांना या रस्त्याने परवानगी देऊ नये, तसेच विरुद्ध दिशेने येणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांवर कडक कारवाई केली पाहिजे. पालिका प्रशासनाने करावी, तसेच ठेकेदाराने रेल्वे फाटकाच्या ठिकाणी ड्रेनेजचे काम सुरू असून, पर्यायी मार्गाचे नामफलक लावावेत.

पालिका प्रशासनाने हांडेवाडी रोड आणि महंमदवाडी रस्त्यावरील खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करावी, असे त्यांनी सांगितले.

महंमदवाडीत खड्डे दुरुस्तीदरम्यान वाहतूककोंडी

महंमदवाडीतील रस्त्यांची खड्डे दुरुस्तीचे काम शनिवारी (दि. २३ ऑक्टोबर) दुपारी ठेकेदाराने सुरू केले. मात्र, वाहतूक वळविण्यासंबंधी किंवा पर्यायी व्यवस्था, तसेच वाहतूक सुरळीत करण्यासाठी कोणतेही नियोजन केले नाही, त्यामुळे प्रचंड वाहतूककोंडी झाली होती. रस्त्यामध्ये खडीमिश्रीत डांबर टाकून खड्डे बुजवित असताना त्यावर रोलर फिरविला जात होता. अरुंद रस्ता असल्यामुळे वाहने पुढे-मागे जाऊ शकत नव्हती, अशी अवस्था झाल्याने दोन्ही बाजूला वाहनांच्या दूरपर्यंत रांगा लागल्याने वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT