PGR26B03470
पांगरी ः अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्याने रस्त्यावर साचलेले पाणी.
पांगरी परिसरात अवकाळी पाऊस; पिकांचे नुकसान
पांगरी, ता. २४ : पांगरीसह आसपासच्या गावाच्या परिसरात आज (ता.२४) दुपारी सुमारे पावणे तीनच्या सुमारास अचानक पावसाच्या सरी कोसळल्या. अवकाळीमुळे काढणीसाठी तयार असलेल्या विविध पिकांना फटका बसला आहे.
दोन दिवसांपासून परिसरातील वातावरणात बदल जाणवत होता. उन्हाची तीव्रता वाढली होती, तर काल (ता.२३) दुपारी अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर हलक्याशा सरी कोसळल्या होत्या. मंगळवारी (ता.२४) दुपारच्या सुमारास पांगरी, चिंचोली, पांढरी, घोळवेवाडी, ढेंबरेवाडी, ममदापूर, जहानपूर आदी गावच्या परिसरात पावसाच्या सरी कोसळल्या. यात काही ठिकाणी रस्त्यांवरून पाणी वाहिले गेले.
अवकाळीचा फटका काढणीसाठी तयार असलेल्या पिकांना बसला आहे. परिसरातील गहू, हरभरा, ज्वारी, कांदा, राजमा, उन्हाळी सोयाबीन यासह वेलवर्गीय पिके, भाजीपाला पिकांना फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.