नियमित कर्ज फेडणाऱ्यांवर नेहमीच अन्याय
लालासाहेब भिसे; प्रोत्साहनपर अनुदान देण्याची मागणी
कऱ्हाड, ता. २ ः शेती क्षेत्रात सतत वाढणारा उत्पादन खर्च, हवामानातील अनिश्चितता आणि बाजारपेठेतील शेतमालाच्या भावातील सततचे चढ-उतार यामुळे राज्यातील शेतकरी गंभीर संकटाचा सामना करत आहेत. कर्जाचा वाढता भार बहुतांश शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. अशा कठीण परिस्थितीत शासनाकडून विविध कर्जमाफी योजनांची घोषणा केली जात असली, तरी नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांच्या हाती मात्र निराशाच येत असल्याचे चित्र आहे. नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांवर नेहमीच अन्याय होत आहे, असा आरोप येथील शेतकरी लालासाहेब भिसे यांनी केला.
श्री. भिसे म्हणाले, ‘‘सरकार कर्जमाफी योजना राबवते; परंतु जे शेतकरी प्रामाणिकपणे आणि वेळेवर कर्जाची परतफेड करतात, त्यांना मिळणारे प्रोत्साहनपर अनुदान वेळेवर न मिळणे अथवा त्यापासून वंचित ठेवणे हा त्यांच्यावर झालेला अन्याय आहे. शासनाकडून जाहीर केलेली प्रोत्साहनपर अनुदानाची १४ हजार कोटी रुपयांची रक्कम अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप जमा झालेली नाही. ही प्रामाणिक शेतकऱ्यांसाठी वेदनादायी आणि फसवणूक करणारी बाब आहे. प्रोत्साहन योजनेचा मूळ उद्देश इतर थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्ज भरण्यासाठी प्रेरित करणे हा असायला हवा. मात्र, नियमित कर्ज भरणाऱ्यांकडे दुर्लक्ष करून केवळ थकबाकीदारांनाच प्राधान्याने कर्जमाफीचा लाभ देणे दुर्दैवी आहे.’’
............
चौकट
.............
या आहेत मागण्या
* थकबाकीदार, नियमित कर्ज भरणारे शेतकरी यांना शासनाने समान हक्क देऊन प्रोत्साहनपर याद्या त्वरित जाहीर कराव्यात.
* नियमित कर्जदार शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रोत्साहनपर रकमा लवकरात लवकर वर्ग कराव्यात.
* वेळेवर अनुदान मिळाल्यास शेतकऱ्यांना पुढील हंगामाचे नियोजन करणे, दर्जेदार खते-बियाणे खरेदी करणे, अवजारे घेणे आणि कुटुंबाच्या दैनंदिन गरजा भागवणे सुलभ होईल.
W44894
लालासाहेब भिसे
-----------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.