Accident Video ESAKAL
पुणे

Pune Video: खामगाव येथे 2 टेम्पोच्या मध्ये चिरडून कामगाराचा मृत्यू; दुर्दैवी घटना CCTV मध्ये कैद

Pune Daund Accident Video: अनमोल ऍग्रो इंडस्ट्रीज कंपनीतील हा दुर्दैवी प्रकार आहे. सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून दृश्य विचलित करणारे आहेत.

कार्तिक पुजारी

Pune News: दौंड तालुक्यातील खामगाव येथे दुर्दैवी घटना घडली आहे. दोन टेम्पोच्या मध्ये चिरडून एका कामागाराचा मृत्यू झाला आहे. अनमोल ऍग्रो इंडस्ट्रीज कंपनीतील हा दुर्दैवी प्रकार आहे. सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून दृश्य विचलित करणारे आहेत. 'साम टीव्ही'ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे,

सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की, एक ट्रक मैदानात फिरत होता. त्याचवेळी दुसरा एक ट्रक अचानक रिव्हर्स घेतो. याच दरम्यान एक कामगार या दोन टेम्पोच्या मध्ये येतो. दोन टेम्पोच्या मध्ये चिरडून या कामगाराचा मृत्यू झाला आहे. आणखी दोन कामगार सुदैवाने यातून बचावले आहेत.

व्हिडिओमध्ये दिसतंय की, तीन व्यक्ती आपल्या मार्गाने जात होते. यावेळी अचानक एक टेम्पो रिव्हर्स येतो. याच वेळी दुसरा एक टेम्पो त्याठिकाणी असतो. यावेळी तीन व्यक्तींपैकी दोन व्यक्ती सुदैवाने टेम्पोपासून दूर जातात. मात्र, एक व्यक्ती दोन टेम्पोच्या बरोबर मध्ये सापडतो. यावेळी दोन टेम्पोमध्ये तो चिरडला जातो. चालकाने टेम्पो पुढे घेतल्यानंतर तो जमिनीवर पडतो.

कामगाराचा जागेवरच मृत्यू झाल्याची माहिती आहे. त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, पण त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस याप्रकरणी कारवाई करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT