CM Eknath Shinde esakal
पुणे

Pune News : सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या गणवेशाची रक्कम तत्काळ द्यावी

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ सुरू झालेले आहे. परंतु सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी गणवेशाची रक्कम अद्याप शाळांना मिळालेली नाही.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - ‘सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या गणवेशाची रक्कम तत्काळ शाळांना देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ सुरू झालेले आहे. परंतु सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी गणवेशाची रक्कम अद्याप शाळांना मिळालेली नाही. त्यामुळे हे विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहिले आहेत.

गणवेशात मिळण्यापासून वंचित राहिलेल्या या विद्यार्थ्यांच्या मनात इतर विद्यार्थ्यांच्याबाबत वेगळी भावना निर्माण होत असल्याचे दिसून येते. इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्वच विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्यात यावा, ही संघटनेची मागणी असल्याचे कांबळे यांनी सांगितले.

सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या गणवेशाची रक्कम शाळांना मिळालेली नाही. ही बाब खेदजनक आहे. तरी सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थ्यांना गणवेश देण्यासाठी त्वरित रक्कम उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी कांबळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Blinkit-Zepto वरून सामान मागवलं... पण मॅन्युफॅक्चरिंग डेटच गायब! आता काय करायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला उपाय

Supreme Court: ''आता ही शेवटची संधी..'' पॅकिंग फूडवरील इशाऱ्याबाबत सर्वोच्च न्यायालय आक्रमक, सरकारसह FSSAI ला अल्टिमेटम

Pune News : पथ विभागाच्या कामांची होणार पोलखोल? महापौरांनी मागितला आठ दिवसात अहवाल

IND vs SL: ‘गॉलचे किंग्स’ कोण? भारतीय फलंदाजांसाठी धोकादायक ठरतोय ‘हा’ विक्रम; आकडे पाहून बसेल धक्का!

Mumbai News : चार महिने झाले... आई अजूनही दाराकडे पाहतेय; ‘अब्दुल’ कुठे आहे?

SCROLL FOR NEXT