dharmendra pradhan sakal
पुणे

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची ‘आयसर’ला भेट

पुण्यातील ‘आयसर’ला प्रधान यांनी शुक्रवारी भेट दिली. यावेळी विविध सुविधांचे उद्‌घाटन त्यांच्या हस्ते झाले.

सकाळ वृत्तसेवा

पुण्यातील ‘आयसर’ला प्रधान यांनी शुक्रवारी भेट दिली. यावेळी विविध सुविधांचे उद्‌घाटन त्यांच्या हस्ते झाले.

पुणे - ‘भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थेतील (आयसर) नव्या विभागांमुळे विविध शाखांसाठी अत्याधुनिक उपाय विकसित करण्यासाठी मदत होईल,’ असा विश्वास केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केला.

पुण्यातील ‘आयसर’ला प्रधान यांनी शुक्रवारी भेट दिली. यावेळी विविध सुविधांचे उद्‌घाटन त्यांच्या हस्ते झाले. आयसरमधील डेटा सायन्स विभागाच्या संशोधन आणि कार्यालयीन इमारतीची पायाभरणी त्यांनी याप्रसंगी केली. संस्थेतील डेटा सायन्स विभागात सांख्यिकी आणि संभाव्यता, अप्लाइड मॅथेमॅटिक्स आणि कॉम्प्युटर सायन्स या तीन मूलभूत अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहेत. शिक्षण, संशोधन आणि नवोन्मेष अशा तीन स्तरीय धोरणांवर या विभागामार्फत भर दिला जाणार आहे. तसेच आरोग्यासंदर्भात जनुकीय कार्यविषयक राष्ट्रीय सुविधेचेही उद्‌घाटनही प्रधान यांच्या हस्ते करण्यात आले. या सुविधेमुळे आजारांचा अभ्यास करण्यासाठी महत्त्वाची मदत होईल, तसेच आरोग्य आणि औषधे यांच्याबाबत महत्त्वाची माहिती मिळू शकणार आहे.

त्याशिवाय केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सुपर कॉम्प्युटिंग मिशनच्या माध्यमातून बसविलेल्या सी-डॅकच्या परम ब्रह्म सुविधा केंद्र, इंद्राणी बालन विज्ञान कृती केंद्र, अटॉमिक फिजिक्स ॲण्ड क्वांटम ऑप्टिक प्रयोगशाळा, सुक्ष्मजीव दर्शक सुविधा केंद्र यांनाही प्रधान यांनी भेट दिली. आयसरमध्ये समाविष्ट झालेल्या नव्या सुविधेमुळे शिक्षणाच्या कक्षा विस्तारतील, संशोधनात सुधारणा होईल आणि जीवशास्त्र, रसायनशास्त्र, पृथ्वीविज्ञान, हवामान बदल अशा विषयातील संशोधनात भर पडणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAKISTAN SEMIS SCENARIOS : न्यूझीलंड हरला, म्हणून पाकड्यांनी जास्त फडफडू नये! उपांत्य फेरीचं समीकरण पाहताच येईल चक्कर...

T20 WC, NZ vs ENG : इंग्लंडने बाजी मारली, पाकिस्तानच्या जीवात जीव आला! न्यूझीलंड पराभूत होऊनही पोहचू शकतात उपांत्य फेरीत

Reliance Group: अंबानींच्या सून राधिका मर्चंट पैठणमध्ये! तीन महिन्यात दुसरा दौरा; पोलिस बंदोबस्तात प्रकल्पाला दिली भेट

Accident : सिंदखेड फाट्यावर दुचाकी चारचाकीची भीषण धडक; एक महिला ठार, एक जखमी

Mount Abu Name Change : जगप्रसिद्ध 'माउंट अबू'सह तीन शहरांचे नामांतर; मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT