Nirmala Sitharaman Sakal
पुणे

Pune : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या फोटोला अज्ञातांनी फासलं काळं

या पूर्वी पुण्यातच सीतारामन यांच्या गाड्याचा ताफा अडवण्याचाही प्रयत्न झाला.

सकाळ डिजिटल टीम

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान पुण्यातल्या धनकवडी भागात त्यांच्या फोटोला काळं फासण्यात आलं आहे. रात्री उशिरा कोणी अज्ञातानी हे कृत्य केल्याचं समोर आलं आहे.

धनकवडी भागात शिवछत्रपती सभागृह इथं निर्मला सीतारामन यांच्या स्वागतासाठी कमान उभारण्यात आली होती. या कमानीवर त्यांचा फोटो लावण्यात आला होता. त्याचसोबत खडकवासला विधानसभा मतदार संघाचे भाजपाचे आमदार भीमराव तापकीर यांचाही या कमानीवर फोटो होता. याच बोर्डावरच्या सीतारामन यांच्या फोटोला काळं फासण्यात आलं आहे.

मध्यरात्री उशिरा हा प्रकार घडल्याची माहिती मिळत आहे. मात्र हा प्रकार कोणी केला, याबद्दल कोणतीही माहिती हाती आलेली नाही. याप्रकरणी अद्याप पोलिसांतही तक्रार देण्यात आलेली नाही. यापूर्वी पुण्यातच निर्मला सीतारामन यांच्या गाड्यांचा ताफा अडवण्याचेही प्रयत्न करण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : मराठी कलाकारांची ठाकरेंच्या मेळाव्याला मोठी हजेरी – कोण कोण आले आहे?

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींनो बँक बॅलेन्स चेक करा... किती येणार 1500 की 3000? जून महिन्याच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

मुंबईत हिंदीत बोलणार, औकात असेल तर हात लावून दाखवा; स्वामी आनंद स्वरुप यांचं ठाकरे बंधूंना आव्हान

"अरे एडिटिंग तरी धड करा" सारंगच्या कावड वारीचा प्रोमो बघून प्रेक्षकांनी दाखवली चूक ; म्हणाले..

PM Modi Leaf Plate: मोदींनी परदेश दौऱ्यात 'या' खास पानावर केले जेवण, जाणून घ्या 'या' पानावर जेवणाचे काय आहेत फायदे

SCROLL FOR NEXT