अंडरवेअर गॅंग sakal
पुणे

मोबाइल चोरण्याचा 'अंडरवेअर फंडा'

खास अंडरवेअर चा वापर करुन चोरी करणाऱ्या अंडरवेअर गॅंग च्या एकाला अटक

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुण्यातील गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने पुण्यातून एका मोबाइल चोराला अटक केली आहे. हा चोर म्हणजे अंडरवेअर गॅंगचा साथीदार आहे, आता तुम्ही विचार कराल अंडरवेअर गॅंग ही काय भानगड आहे? तर मोबाईल चोरीसाठी या गॅंग चे साथीदार खिसे असलेल्या विशेष अंडरवेअर वापरतात जेणेकरुन एकापेक्षा जास्त मोबाईल एकाच वेळी चोरी करता येतील, आरोपी हा मूळचा आंध्र प्रदेशातील रहिवासी असून त्याच्या टोळी महाराष्ट्रासह कर्नाटकात अनेक ठिकाणी चोऱ्या केल्या आहेत. पुणे पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास केला जात आहे.

नागेश आप्पाना असं अटक करण्यात आलेल्या 25 वर्षीय मोबाइल चोरट्याचं नाव आहे, पोलिसांनी आरोपीकडून 38 महागडे मोबाइल फोन आणि ईर्टीगा कार जप्त केली आहे. आरोपी आपल्या टोळीसह हैदराबादहून पुण्यात कारने येत असत. पीएमपी बसमधील गर्दीचा फायदा घेत आरोपी प्रवाशांचे मोाबाइल गायब करत होते. गेल्या बऱ्याच दिवसांपासून आरोपींचा हा उद्योग सुरू होता. संबंधित मोबाइल चोरटे पीएमपीएल बसमधील प्रवाशांचे मोबाइल चोरण्यासाठी खास अंडरवेअरचा वापर करत होते. गर्दीत प्रवाशाचा मोबाइल चोरल्यानंतर तो मोबाइल चोरटे आपल्या अंडरवेअरमध्ये लपवत असायचे. त्यामुळे त्यांची झडती घेतली तरी मोबाइल हाती लागत नव्हते. यापूर्वी आरोपीवर पुण्यातील भारती विद्यापीठ आणि स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहे, या प्रकरणाचा पुढील तपास पुणे पोलीस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tirupati Balaji Temple Record Gold Donation : तिरुपती बालाजीच्या चरणी भक्तीचा अनोखा महासागर! चेन्नईच्या जैन दाम्पत्याने अर्पण केले तब्बल १२१ किलो सोने अन् २३८ कॅरेट हिरे; किंमत पाहून व्हाल थक्क!

Paternity Leave: CM विजय यांचा क्रांतिकारी निर्णय; आता बाळाच्या जन्मावेळी वडिलांनाही मिळणार १५ दिवसांची सुट्टी

IPL 2027 Trade: ... तर हार्दिक पांड्या राजस्थान रॉयल्स संघात असता, पण दोन खेळाडूंमुळे फिस्कटली डील

IND A vs SL A, Semi-Final: वैभव-अभिषेकची वादळी खेळी अन् मग तिलक - शाहबाजची फिफ्टी; भारताचे श्रीलंकेसमोर मोठे लक्ष्य

Latest Marathi News Live Update: ५०० कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवर रामदास कदमांचा नवा दावा; 'माझ्याकडे आणखी...'

SCROLL FOR NEXT