Tarun-Uppal-and-Manoj-Sinha 
पुणे

चंद्रभागेच्या साक्षीनं महाराष्ट्र-जम्मूचा अनोखा 'संगम'; पुणे-चिनाब मैत्रीपर्वाचा नवा अध्याय

संतोष शाळिग्राम

जम्मू - चिनाब खोऱ्यातील दोडा जिल्ह्यात हुतात्मा स्मारक, शाळा उभारणी आणि अन्य विकास प्रकल्प सुरू करुन हा प्रदेश महाराष्ट्राला जोडण्याच्या प्रयत्नांचे आणखी एक पाऊल पडले. हे उपक्रम सुरु करण्यासाठी नायब राज्यपालांबरोबर 'सरहद'ची सकारात्मक चर्चा झाली. महाराष्ट्रातील चंद्रभागा आणि जम्मूतील चंद्रभागा (चिनाब) यांच्या भेटीचा असा अनोखा संयोग यानिमित्ताने जुळून आला. 

पुण्यातील सरहद आणि अर्हम फाऊंडेशनने जम्मूला संयुक्तपणे हे पाऊल टाकले आहे. निसर्ग सौंदर्यांची उधळण असलेल्या; परंतु दुर्लक्षित चिनाब खोऱ्यात शिक्षण, पर्यटन आणि तेथील नागरिकांच्या आर्थिक विकासाची कार्ये ही उद्दिष्टे या उपक्रमात आहेत. त्यादृष्टीने 'सरहद'चे संजय सोनवणी, अर्हम फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. शैलेश पगारिया, 'सरहद'चे जम्मूतील संघटक तरुण उप्पल यांनी नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांची भेट घेतली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चिनाब खोऱ्यातील दहशतवाद्यांशी लढताना बळी गेलेल्या नागरिकांच्या हुतात्मा स्मारकाची दोडा येथे उभारणी, तसेच या खोऱ्यातील दुर्लक्षित आणि अज्ञात सौंदर्य स्थळे जागतिक पर्यटनाच्या नकाशावर आणणे, तेथील शेतीमालास, हस्तोद्योग उत्पादनांना महाराष्ट्रात बाजारपेठ उपलब्ध करून देत स्थानिक शेतकऱ्यांना उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत मिळवून देणे आदी विषयांवर या बैठकीत चर्चा झाली. या उपक्रमासाठी सरकारी परवानगी आणि अन्य प्रक्रियांसाठी सहकार्य करण्याची विनंती या संस्थांच्या वतीने राज्यपालांना करण्यात आली.

सोनवणी म्हणाले, "चिनाब खोऱ्याची सौंदर्यस्थळे दाखविणारे अमेझिंग लिटिल काश्मीर हे कॉफी टेबलबुक सरहदने प्रकाशित केले आहे. त्यामुळे पर्यटकांचे लक्ष चिनाब खोऱ्याकडे वेधले जात आहे. या खोऱ्यातील हस्तकला उद्योग आणि फळ उत्पादने यांना पुण्यात मोठ्या प्रमाणात बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात यश मिळते आहे. तेथील सरकारच्या मदतीने हे कार्य विस्तारण्यासाठी आम्ही नायब राज्यपालांची भेट घेऊन चर्चा केली आहे.

डॉ. शैलेश पगारिया म्हणाले, "चिनाब खोऱ्यात शाळा सुरू करून दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना उत्कृष्ट दर्जाचे  शिक्षण आम्ही देणार आहोत. तसेच बुद्धिमान विद्यार्थ्यांसाठी पुणे येथे उच्च शिक्षणाची व्यवस्थाही केली जाईल. त्यासाठीच ही भेट होती. त्यांनीही सर्वतोपरी मदत करण्याचे मान्य केले आहे."

विकास कामांसाठी जागा देण्याचे आश्वासन
चिनाब नदीचे पुरातन नाव हे चंद्रभागा आहे. महाराष्ट्राचे आराध्य श्री विठ्ठलाच्या पंढरीलाही चंद्रभागेचा स्पर्श झाला आहे. जम्मूतील या चंद्रभागेच्या परिसराचे सौंदर्य उजाळणाऱ्या कॉफी टेबल बुकच्या माध्यमातून महाराष्ट्राला जम्मूतील चंद्रभागेची ओळख झाली. हे कॉफी टेबल बुक नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांना यावेळी भेट देण्यात आले. सरहद आणि अर्हम फाऊंडेशन हे जम्मू-काश्मीरमध्ये करीत असलेल्या कार्याचे त्यांनी विशेष कौतुक केले. या भागात हुतात्मा स्मारक, शाळा उभारणीसाठी जागा देऊ, असे ते म्हणाले.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court चे माजी न्यायाधीशच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरोधात सर्वोच्च न्यायालयात; नेमकं काय घडलं?

AUS vs BAN 1st Test: बांगलादेश ऐतिहासिक विजयाच्या उंबरठ्यावर; ऑस्ट्रेलियाला रडवले, कसोटीचा इतिहास-भूगोल बदलणारा सामना...

Western Railway: ३० लाखांच्या गर्दीसमोर पश्चिम रेल्वे हतबल; २,५५९ पदे रिक्त, नियंत्रणासाठी कंत्राटी मनुष्यबळाचा आधार

Marathi News Live Updates : पंजाब हरियाणातील शेतकऱ्यांचा आज दिल्लीकडे मोर्चा

UP Freedom Struggle Circuit: स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणी आता पर्यटकांना अनुभवता येणार; यूपीमध्ये ‘स्वातंत्र्य संग्राम सर्किट’

SCROLL FOR NEXT