पुणे

रंगाची अनोखी उधळण

गौरी गोखले

पुणे - एरवी होळी-रंगपंचमी म्हटले, की सोसायटीत ठराविक जणांनी एकत्र यायचे आणि गाणी लावून रंगांची उधळण करायची, असे चित्र पाहायला मिळतं. यात एकमेकांना आनंद मिळत असला, तरी पाणी वाया जाण्याबरोबरच रंगांमुळे सोसायटीचा परिसर बेरंग होणार हे ठरलेलंच; पण याच रंगांची योग्य ठिकाणी उधळण झाली आणि त्यात सर्वांचा सहभाग असला, तर काय होते, याचे आगळे उदाहरणच बाणेरमधील योगी पार्क परिसरातील पियोनी हौसिंग सोसायटीने घालून दिले. सोसायटीमधील आबालवृद्धांनी एकत्र येऊन सोसायटीमधील भिंत आकर्षक रंगसंगतीने रंगवून काढली आणि अनोखी रंगपंचमी साजरी केली.  

 सोसायटीतील सर्वांनी ब्रश हातात घेऊन आपल्या मनपसंत रंगांची पेरणी केली आणि भिंतीवर निसर्गाचे आगळे-वेगळे रूप साकारले. अश्‍विनी आणि राजीव रुद्राक्षी व रमेश माळगे इथले रहिवासी आहेत, ज्यांनी मोठ्या हौसेने या नवीन प्रकारच्या रंगांची उधळण करण्याची कल्पना मांडली आणि आम्ही सर्वांनी प्रथमच हातात ब्रश व रंग घेऊन वेगवेगळ्या छटांना रंग दिला. एरवी सोसायटी म्हटले, की शेजारी कोण राहतो, हेही माहिती नसते; पण हे सर्व भेदाभेद गळून सर्व जण एकदिलाने आणि कोणतीही सक्ती न करता आनंदाने एकत्र आले आणि खऱ्या खुऱ्या रंगांची उधळण झाली. २०१० मध्ये सोसायटीची उभारणी झाली, तेव्हापासून ही भिंत तशी काळवंडलेल्या अवस्थेत होती. ती होळीच्या दिवशी रहिवाशांनीच एकत्र येऊन स्वच्छ केली. त्यावर खडूने चित्र रेखाटली. त्यात सूर्योदय, फुले व पाने, फुलपाखरू, हरिण, पक्षी अशा एक ना अनेक प्रकारे निसर्ग साकारला गेला आणि त्यात सोसायटीमधील रहिवाशांनी आपापल्या कल्पनेप्रमाणे विविध रंग भरले. आणि त्यातून एक सुरेख निसर्ग चित्र आकाराला आले. अनेकांनी यानिमित्ताने पहिल्यांदाच ब्रश हातात धरला, हा अनुभव प्रत्येकासाठी वेगळाच आनंद देणारा आणि एकीचे दर्शन घडविणारा होता. 

भिंतच ठरली सेल्फी पॉइंट
भिंतीवरची रंगांची उधळण झाल्यावर सर्वांनी रंगांची मजा घेतली, ती एकमेकांना रंग लावून रंग खेळण्यात. एका सोसायटीत राहणारे रोज एकमेकांना येता-जाता केवळ हाय, हॅलो करणारे आज एक दुसऱ्यांना रंग लावून सणाचा आनंद घेत होते. हा दिवस सोसायटीतील एक अविस्मरणीय दिवस ठरल्याच्या भावना रहिवाशांनी व्यक्त केल्या. मोबाईल सेल्फीच्या जमान्यात ही भिंतच सेल्फी पॉइंट ठरलीय.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आजचे राशिभविष्य - 28 ऑक्टोबर 2026

Sprouts Thalipeeth: मोड आलेली कडधान्यं आणि गव्हाचं पीठ, कमी साहित्यात बनवा पौष्टिक थालीपीठ; मुलांच्या डब्यासाठीही उत्तम!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 28 ऑक्टोबर 2026

FDA Crime : बीडमध्ये आरोग्याशी खेळणाऱ्या ‘झम झम’ कारखान्यावर एफडीएचा दणका! ७ हजार बाटल्यांसह पावणेदोन लाखांचा माल जप्त

शनीच्या नक्षत्र बदलामुळे ५ राशींचं नशीब पालटणार! पुढचे १०४ दिवस ठरणार खास

SCROLL FOR NEXT