फोटो ः अर्पण धर
भावेश मखिजा
---------------------------------
युनायटेडची स्टार्स क्लबवर मात
पुणे, ता. १६ ः पाथ-वे फाउंडेशन आयोजित पहिल्या दोशी इंजिनिअर्स करंडक एकोणीस वर्षांखालील गटाच्या निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत अर्पण धर आणि भावेश मखिजाने केलेल्या शतकाच्या जोरावर युनायटेड क्लबने स्टार्स क्लबचा ५७ धावांनी पराभव केला.
गुलटेकडी येथील सेठ दगडूराम कटारिया प्रशालेच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत प्रथम फलंदाजी करताना युनायटेड क्रिकेट क्लबने सहा बाद ३१७ धावा केल्या. यावेळी अर्पण धरने ९५ चेंडूंत अकरा चौकार व चार षटकारांसह नाबाद १०८ धावांची तर भावेश मखिजाने १३६ चेंडूंत पंधरा चौकार व एक षटकारासह १०१ धावांची केलेली खेळी उपयुक्त ठरली. त्यांना वेंकटेश कळमकरने ४२ धावांची खेळी करत सुरेख साथ दिली. प्रत्युत्तर देताना स्टार्स क्लबचा डाव २६० धावांत आटोपला. यावेळी अर्जुन खिरीडने ६२ धावांची, विश्वजित जगतापने ४८ धावांची, रोहा शिरभातेने ४४ धावांची तर एरोन बिनुने ४३ धावांची केलेली खेळी अपुरी पडली. रुद्राक्ष मालवियाने तीन तर श्याम जीआर व अंश टिल्लूने प्रत्येकी दोन गडी बाद केले. ‘सामनावीर’ हा मान अर्पण धरने मिळविला.
संक्षिप्त धावफलक ः
युनायटेड क्रिकेट क्लब- (५० षटकांत) ६ बाद ३१७ (अर्पण धर नाबाद १०८, भावेश मखिजा १०१, वेंकटेश कळमकर ४२, शिवम साळुंखे १-२२, रोहन शिरभाते १-४१) विजयी विरुद्ध स्टार्स क्रिकेट क्लब - (४९.४ षटकांत) सर्वबाद २६० (अर्जुन खिरीड ६२, विश्वजित जगताप ४८, रोहा शिरभाते ४४, एरोन बिनू ४३, प्रेमराज जगदाळे २६, रुद्राक्ष मालविया ३-६, श्याम जी आर २-३८, अंश टिल्लू २-४२).
-----------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.