संघटित हिंदू समाज काळाची गरज
हेमंत हरहरे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दीनिमित्त धर्माचार्य परिषद
सातारा, ता. ११ : लव्ह जिहाद, लँड जिहाद असे अनेक प्रकार आपल्यासमोर येत असून, हिंदू धर्मातील सर्व संत महंत एकत्र आले नाहीत, तर हे धर्मांतराचे संकट पुढील काळात येणाऱ्या पिढ्यांना संपवून टाकू शकते. त्यामुळे केवळ आपल्या पंथ संप्रदायाचा विचार न करता सर्वात आधी आम्ही हिंदू आहोत आणि मग आपल्या उपासना पद्धती आहेत, असा विचार आता करावा लागेल. विविध आव्हानांना सामोरे जाण्यासाठी भेदाभेद विसरून संघटित व सशक्त हिंदू समाज आजच्या काळाची पहिली गरज आहे, असे मत राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे प्रांत कार्यकारिणी सदस्य हेमंत हरहरे यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त जनसंवाद कार्यक्रमांत धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांसाठी धर्माचार्य परिषद या झाली. यावेळी संघाचे प्रांत समरसता संयोजक मुकुंदराव आफळे, शांतिगिरीजी महाराज, नंदगिरी महाराज आदी उपस्थित होते. मुकुंदराव आफळे यांनी सामाजिक समरसता, पर्यावरण, कुटुंब प्रबोधन, स्वबोध व नागरी शिष्टाचार या पंचपरिवर्तन विषयाची मांडणी केली.
यावेळी कोल्हापूर विभाग धर्माचार्य गोपीनाथ कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. वक्त्यांचा परिचय ॲड. महेश कुलकर्णी यांनी करून दिला. श्री श्री शांतिगिरी महाराज व नंदगिरी महाराज यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याचा आढावा घेतला. कीर्तनकार भक्ती देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हा संयोजक प्रसाद गरगटे यांनी आभार मानले. यावेळी सातारा शहर संघ चालक ॲड. नितीन शिंगटे, जिल्हा कार्यवाह महेश शिवदे, सहकार्यवाह आशुतोष आठल्ये तसेच विविध क्षेत्रात काम करणारे १०४ मान्यवर उपस्थित होते.
..............................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.