Universe Sakal
पुणे

Pune News : शास्त्रज्ञांनी सुचविली विश्वाच्या विस्तार मोजणारी नवी प्रणाली

रात्रीच्या आकाशात शांत आणि स्थिर दिसणारे विश्व दिवसेंदिवस विस्तारत असल्याचे १९२९ मध्ये शास्त्रज्ञांच्या लक्षात आले.

सम्राट कदम

पुणे - रात्रीच्या आकाशात शांत आणि स्थिर दिसणारे विश्व दिवसेंदिवस विस्तारत असल्याचे १९२९ मध्ये शास्त्रज्ञांच्या लक्षात आले. विश्वाची निर्मिती एका महास्फोटातून (बीग बॅंग) झाल्याच्या सिद्धांताला पुष्टी देणाऱ्या या विस्ताराचा दर नक्की किती आहे. याचा शोध शास्त्रज्ञ कित्येक वर्षांपासून घेत आहे. आता यासाठीची एक नवी पद्धत भारतीय शास्त्रज्ञांनी विकसित केली आहे. ज्यामध्ये गुरूत्वीय लेन्सिंगचा वापर सुचविण्यात आला आहे.

पुण्यातील आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी केंद्र (आयुका), आंतरराष्ट्रीय सैद्धातिकभौतिकी केंद्र-टाटा मूलभूत संशोधन संस्था (टीआयएफआर), , कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांचे हे संशोधन फिजिकल रिव्ह्यू लेटर या शोधपत्रिकेत प्रसिद्ध झाले आहे.

विशेष म्हणजे मुख्य संपादकीय म्हणून या संशोधनाला स्थान देण्यात आले आहे. या संशोधनामुळे विश्वाच्या विस्ताराचा दर निश्चित करणे शक्य होणार आहे. आयुकाचे प्रा. शाश्वत जे. कपाडिया, कॅलिफोर्निया विद्यापीठा प्रो. तेजस्वी वेणुमाधव आणि टीआयएफआरचे परमेश्वरन अजित यांनी हे संशोधन केले. शास्त्रज्ञांचा हा गट आता गुरुत्वाकर्षणाच्या दृष्टिकोनातून विश्वाच्या विविध प्रतिमांमधील फरक अभ्यासण्याच्या शक्यता शोधत आहे.

संशोधनाची पार्श्वभूमी...

ब्रह्मांडाचा विस्तार हा बिग बँग नावाच्या सुरवातीच्या स्फोटातून झाल्याचे आपल्याला माहीत आहे. मात्र, अजूनही ब्रह्मांडाच्या विस्ताराची पद्धत आणि स्वरूप अद्याप निश्चित करणे बाकी आहे. विशेषत: विश्वाच्या विस्ताराचा दर निरीक्षणाद्वारे अद्याप समोर आलेला नाही. सध्या शास्त्रज्ञ सुपरनोव्हाची चमक आणि कॉस्मिक मायक्रोवेव्ह पार्श्वभूमी मधील नमुन्यांची निरीक्षणे वापरतात. ज्यातील मोजमाप एकमेकांपासून भिन्न माहिती देते. आता शास्त्रज्ञांनी प्रथमच गुरूत्वीय लहरींच्या अभ्यासातून विश्वाच्या विस्ताराचा दर निश्चित करण्याची पद्धत समोर आणली आहे.

संशोधनाचे स्वरूप...

- अवकाश आणि काळातील लहरी म्हणजे गुरुत्वीय लहरी होय. ज्यांची निर्मिती महाकाय कृष्णविवरांच्या विलीनीकरणातून होते.

- लायगो आणि व्हर्गो या प्रयोगशाळांनी अशा सुमारे शंभर घटना शोधल्या आहेत.

- जर या गुरुत्वाकर्षण लहरी दीर्घिका समूहांपासून जात असतील तर त्यांचे मार्ग वक्र होतात.

- ज्याला गुरुत्वाकर्षण-लेन्सिंग म्हणतात, याच्या वापरातून विलंबाचे निरीक्षण करत विस्ताराचा दर निश्चित करता येईल

- सध्या जरी गुरुत्वाकर्षण लेन्सिंग टिपता येत नसले तर भविष्यात शक्य आहे.

भविष्यातील गुरूत्वीय लहरींचे डिटेक्टर सध्याच्या डिटेक्टरपेक्षा खूप जास्त अंतर पाहण्यास सक्षम असतील. ज्यामुळे कृष्णविवरांचे लाखो विलीनीकरण शोधता येईल. या पद्धतीमध्ये गुरुत्वीय लहरींच्या अनेक प्रतिकृती निर्माण करणाऱ्या प्रत्येक आकाशगंगेचे गुणधर्म, कृष्णविवराच्या जोड्यांचे अंतर किंवा आकाशातील त्यांचे नेमके स्थान जाणून घेणे आवश्यक नसते. तर विश्वाच्या प्रतिमांमधील फरक या साठी पुरेसा ठरेल.

- प्रा. शाश्वत जे. कपाडिया, शास्त्रज्ञ, आयुका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Blockade: 'जवळ आलात तर नष्ट करून टाकू'! डोनाल्ड ट्रम्प यांची आक्रमक धमकी; इराणच्या बंदरांवर नाकाबंदी

SRH vs RR : ७ धावांत ४ विकेट्स! Praful Hinge ने इतिहास रचला; वैभव सूर्यवंशीची विकेट मिळताच काव्या मारनचा आनंद पाहा... Video

Mumbai Pune Expressway: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ सज्ज; एक मेपासून मार्ग खुला होणार, बोगद्यांत ‘एआय’ सुरक्षाप्रणाली..

RR vs SRH: वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल अन्... विदर्भच्या पोरांनं मैदान गाजवलं; जे भल्याभल्यांना जमलं नाही ते करून दाखवलं

Baramati Bypoll News: बारामती पोटनिवडणूक : सुनेत्रा पवारांच्या विजयासाठी भाजपचा बूथस्तरावर निर्धार, विकासकामांवर भर

SCROLL FOR NEXT