विद्यापीठाचा सोमवारी पदवीप्रदान सोहळा sakal
पुणे

विद्यापीठाचा सोमवारी पदवीप्रदान सोहळा

तीन हजार ८०० विद्यार्थ्यांना मिळणार पदवी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ११९ वा पदवी प्रदान सोहळा येत्या सोमवारी (ता.१३) राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत सकाळी ११ वाजता विद्यापीठातील ज्ञानेश्वर सभागृहात होणार आहे. यावेळी ऑस्ट्रेलियाचे वाणिज्य दूत (काऊंसलेट जनरल) पीटर ट्रसवेल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितीत राहणार आहेत.या सोहळ्यात ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२० या वर्षात आणि त्यापूर्वी उत्तीर्ण झालेल्या विविध विद्याशाखांमधील पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील एकूण तीन हजार ८०६  विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र वितरित करण्यात येणार आहे. त्यापैकी ४३ पीएच.डी धारक विद्यार्थी आहेत, अशी माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे परीक्षा संचालक डॉ. महेश काकडे यांनी दिली.

या वर्षातील हा दुसरा पदवी प्रदान समारंभ सोमवारी होत आहे.कोरोना पार्श्वभूमीवर हा पदवी प्रदान समारंभ मर्यादित निमंत्रितांच्या उपस्थितीत होणार आहे. सर्व विद्यार्थ्यांना त्यांचे पदवी प्रमाणपत्र पोस्टाद्वारे पाठविण्यात येणार असून विद्यार्थ्यांनी विद्यापीठात हजर राहण्याची आवश्यकता नाही. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर या समारंभाचे प्रक्षेपण केले जाईल, असेही डॉ. काकडे यांनी स्पष्ट केले.

पदवीदान समारंभ पाहण्यासाठी लिंक

http://webcast.unipune.ac.in

पदवी मिळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या :अभ्यासक्रम : विद्यार्थ्यांची संख्या

  • पदविका : ४३

  • पदवी : २,८६२

  • एम.फिल : ६

  • पदव्युत्तर पदविका : ४

  • पीएच.डी. : ४३

  • पदव्युत्तर पदवी : ८४८

  • एकूण : ३,८०६

विद्यार्थी संघटनांची नाराजी

विद्यापीठाचा पदवी प्रदान सोहळा केवळ अवघ्या दोन दिवसांचा कालावधी राहिला असताना अचानकपणे शनिवारी जाहीर करण्यात आला. त्याबाबत विद्यार्थ्यांना किमान काही दिवस अगोदर माहिती न दिल्याने विद्यार्थी संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तर काही विद्यार्थ्यांना अद्याप गुणपत्रिका मिळालेल्या नाहीत, असे असताना पदवी प्रमाणपत्र मिळणार कसे?, पदवी प्रदान सोहळ्याबाबत विद्यापीठाने काही दिवस आधी परिपत्रक का काढले नाही?, असे प्रश्न विद्यार्थी संघटनांनी उपस्थित केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : हे बिल दलित आणि मागासवर्गीय लोकांच्या हिताचे नाही - राहुल गांधी

फक्त 50 रुपये दंड ! प्राण्यांविरुद्धच्या अत्याचारांवर अभिनेत्री पूजा सावंत व्यक्त "मी पोलीस ऑफिसर असते तर"

Bhooth Bangla X Review: कसा आहे अक्षय कुमारचा 'भूत बंगला'? ट्विटरवर लोकांनी कुंडली मांडली, म्हणाले- हे तर...

Walmik Karad Video: अजूनही पायात चप्पल नाही... वर्षभरानंतर वाल्मिक कराडचा व्हिडीओ आला; प्रकृती बिघडली

'स्वामींची कृपा असेल की, मी तिला...' थोडक्यात वाचली होती क्रांती रेडकर, केदार शिंदे जत्रा सिनेमाचा प्रसंग सांगताना म्हणाले...

SCROLL FOR NEXT