Savitribai Phule Pune University Sakal
पुणे

विद्यापीठातील दोघांना नियमबाह्य पीएचडी प्रवेश

सिनेट सदस्य बुचडे; गैरप्रकार रोखण्यासाठी चौकशीची मागणी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दोन विद्यार्थ्यांना नियमबाह्य पद्धतीने पीएचडीला प्रवेश दिला असून, गैरप्रकार रोखण्यासाठी संबंधीत प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी विद्यापीठाचे अधिसभा सदस्य विवेक बुचडे यांनी केली आहे.

नवी पेठेतील श्रमिक पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी विद्यापीठ प्रशासनावर आरोप केले. ते म्हणाले,‘‘पीएचडी प्रवेशासाठी होणाऱ्या पेट परीक्षा देण्यापासून दोन विद्यार्थ्यांना नियमबाह्य पद्धतीने सूट दिली आहे. या दोन विद्यार्थ्यांमध्ये एक विद्यापीठाचे अधिकारी आहे, तर एक नामवंत कॉलेजमधील वरिष्ठ लिपीक आहे. त्यामुळे पुणे विद्यापीठ प्रशासन चौकशी करण्यासाठी टाळाटाळ करीत आहे.’’ पेट परीक्षेतून सूट मिळालेल्या दोन विद्यार्थ्यांचे संशोधन केंद्र आणि मार्गदर्शकही एकच आहे. या दोघांनाही कोणत्या आधारावर पीएचडीसाठी प्रवेश देण्यात आला, याची चौकशी होण्याची आवश्यकता आहे. संशोधन क्षेत्रात असे गैरप्रकार योग्य नसल्याचे बुचडे यांनी सांगितले.

विवेक बुचडेंचा दावा..

  • पदव्युत्तर पदवीनंतर सरकारी किंवा खासगी क्षेत्रात वरिष्ठ पदावर सलग दहा वर्षे कामाचा अनुभव असणाऱ्यांना पेट परीक्षेपासून सूट देण्यात येत होती

  • २०१४ मध्ये अस्तित्वात आलेल्या नियमानुसार विद्यापीठामध्ये २०१५-१६ या शैक्षणिक वर्षात ८० विद्यार्थ्यांनी पीएचडीसाठी प्रवेश घेतला होता

  • यामध्ये २२ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कागदपत्रांमध्ये त्रुटी निघाल्या. त्यात २० विद्यार्थ्यांनी कागदपत्रांद्वारे त्रुटींची पूर्तता केली

  • मात्र, दोन विद्यार्थ्यांना पेट परीक्षा देण्यापासून नियमबाह्य पद्धतीने सूट दिल्याचे समोर आले

  • प्रकरणाच्या तपासासाठी व्ही.बी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्ठापन करण्यात आल्याचे, मला सांगण्यात आले

  • मात्र, समितीचे अधिकृत पत्र दिले नाही.

पीएचडीच्या अशा प्रवेशा संबंधी नेमण्यात आलेल्या समितीचा अहवाल आला असून, संबंधित प्रवेश रीतसर करण्यात आले आहेत. यासंबंधी जी तांत्रिक अडचण होती ती दूर करण्यात आली आहे.

- डॉ. एन.एस.उमराणी, प्र-कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे – एकनाथ शिंदे

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT