पुणे

संस्कृत भाषा

CD

संस्कृत ही जगातील सर्वात प्राचीन आणि समृद्ध भाषांपैकी एक आहे. तिला ‘देववाणी’, ‘सुरवाणी’, किंवा ‘गिर्वाणभारती’ असेही म्हटले जाते. कारण प्राचीन काळात धार्मिक ग्रंथ, वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत याची रचना याच भाषेने चिरंजीव केली आहे. संस्कृत भाषा ही उत्तर भारतातील भाषांची जननी व द्रविड भाषांची पोषण करणारी अतिप्राचीन भाषा आहे.
आजच्या युगामध्ये संस्कृत भाषा ही लोप पावत आहे. संस्कृत केवळ पूजापाठाची भाषा नसून ती ज्ञानभाषा आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांने संस्कृत भाषा ही आत्मसात करायला हवी. संस्कृत भाषेमध्ये असणारी सुभाषिते ही विद्यार्थ्यांच्या आयुष्यभराची शिदोरी आहे. सज्जनप्रशंसा, गुरू स्तुती, चारित्र्य आणि विद्यासंपादन यांचे महत्त्व, तसेच पुत्राचे कर्तव्य, सत्य-असत्य, विद्वान-मूर्ख अशा अनेक विषयांवर असणाऱ्या सुभाषितांमुळे विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार होतात, जिच्या मंत्रोच्चारातून सभोवतालचा परिसर संरक्षित, पवित्र आणि मंगलमय होतो.
संस्कृतमधील श्लोकांचे पठण केल्यामुळे स्मरणशक्ती वाढते. या भाषेतील वर्णांच्या उच्चारणामुळे जिभेला चांगले वळण लागते आणि विद्यार्थ्यांचे उच्चार अधिक स्पष्ट व शुद्ध होतात, तसेच बुद्धी तल्लख होते. संस्कृतचे व्याकरण अतिशय शिस्तबद्ध आहे. हे शिकल्यामुळे विद्यार्थ्यांना इतर भाषा शिकणे सोपे जाते. नासासारख्या जागतिक संस्थांनीही संस्कृतच्या व्याकरणबद्ध रचनेचे कौतुक केले असून, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि संगणकीय प्रक्रियेसाठी ही सर्वात सुसंगत भाषा असल्याचे मान्य केले आहे. संस्कृत ही केवळ प्राचीन भाषा नसून ती ‘नित्यनूतन’ भाषा आहे. ती आपल्याला आपल्या मुळांशी जोडते आणि भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी लागणारी बौद्धिक शिस्त लावते. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी संस्कृतचा अभ्यास केल्यास त्यांचे व्यक्तिमत्त्व अधिक संतुलित, सुसंस्कृत आणि तेजस्वी होईल यात शंका नाही. प्रशासकीय सेवांच्या मुलाखतीमध्ये जर तुमची पार्श्वभूमी संस्कृतची असेल, तर ते तुमच्या सुसंस्कृत आणि शिस्तबद्ध व्यक्तिमत्त्वाचे प्रतीक मानले जाते. भारतीय वारशाबद्दलची तुमची जाण अधिकाऱ्यांना प्रभावित करू शकते.
संस्कृत भाषा ही केवळ शाळा- कॉलेज पुरती मर्यादित नाही तर या भाषेतही रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. योग आणि आयुर्वेद क्षेत्रातही जागतिक स्तरावर संधी उपलब्ध आहेत. प्राचीन हस्तलिखितांचे जतन, चित्रपट व नाट्य क्षेत्रातील संवाद लेखन आणि विदेशी विद्यापीठांमध्ये संस्कृत संशोधक म्हणून करिअरच्या अनेक वाटा खुल्या झाल्या आहेत. म्हणूनच मला असे वाटते, की प्रत्येक विद्यार्थ्याने या भाषेचे संवर्धन करणे म्हणजेच भारताच्या गौरवशाली इतिहासाचे आणि ज्ञानाचे रक्षण करणे होय.

- कोमल इथापे
वाई
W15528

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

खान सर प्रकरणातील आरोपीचा नेपाळमध्ये संशयास्पद मृत्यू, अटकेच्या भीतीनं गेलेला पळून

तुरुंग निरीक्षकाचा घरात आढळला मृतदेह, पत्नीचे महासंचालकांवर गंभीर आरोप; पोलिसात दाखल केली तक्रार

Latest Live Updates Marathi: आजही सरकारला वंचित बहुजन आघाडीची धास्ती भरते - सुजात आंबेडकर वंचित नेते

World Blood Donor Day 2026: शाकाहारी लोक रक्तदान करू शकत नाहीत? रक्तदानाबद्दलचे 'हे' Myths आणि Facts जाणून घ्याच

छोट्या पडद्यावर परतणार शिव आणि गौरीची हिट जोडी; प्रोमो पाहून प्रेक्षक खुश; 'या' मालिकेत दिसणार

SCROLL FOR NEXT