पुणे

कच्च्या रस्त्यामुळे नागरिक त्रस्त

CD

घोरपडी, ता. ७ : सोपान बाग परिसरातील ताराबाग येथे रेल्वे मार्गालगत असलेला अंतर्गत रस्ता गेल्या चार वर्षांपासून कच्च्या अवस्थेत असल्याने स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. संबंधित सोसायटीचे बांधकाम सुरू असताना बिल्डरने तात्पुरता कच्चा रस्ता तयार केला होता. मात्र त्यानंतर कायमस्वरूपी डांबरीकरण किंवा काँक्रीटीकरण करण्यात आलेले नाही.
या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे असून धुळीचे लोट उठत आहेत. वाहनांच्या वर्दळीमुळे उडणारी धूळ थेट घरांमध्ये शिरते. त्यामुळे आरोग्याच्या तक्रारी वाढत असल्याचे नागरिकांचे मत आहे. तसेच परिसरात मोठ्या प्रमाणावर बांधकाम सुरू आहे. जड वाहने, मातीचे ट्रक आणि बांधकाम साहित्य वाहून नेणारी यंत्रसामग्री यामुळे रस्त्याची अवस्था आणखी खराब झाली आहे. रस्त्यावर सतत माती आणि खडी साचत असल्याने चिखलाचे प्रमाण वाढले आहे. चारचाकी वाहन चालवणेही कठीण झाले असून अनेकवेळा वाहने अडकतात.
पावसाळ्यात या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचते. चिखलामुळे वाहन घसरून अपघात होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. अनेक दुचाकीस्वार पडून जखमी झाले असून काहींना फ्रॅक्चर झाले आहे. शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक, कामगार, महिलांना मोठा त्रास सहन करावा लागतो. सोसायटीतील नागरिकांनी संबंधित बिल्डर तसेच महापालिका प्रशासनाकडे वारंवार लेखी व तोंडी तक्रारी केल्या आहेत. मात्र अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही.

चार वर्षांपासून आश्वासने मिळत आहेत, पण रस्ता अजूनही तसाच आहे. रस्त्याची दुरवस्था लक्षात घेता भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका किंवा अग्निशमन दलाची वाहने वेळेत पोहोचतील का असा प्रश्न पडला आहे. कायमस्वरूपी पक्का रस्ता तयार करावा.
- योगेश पितळे, स्थानिक नागरिक

रेल्वे लगतच्या या रस्ता यासंदर्भात आमच्याकडे तक्रार आली असून याकरिता मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता आहे. त्यासंदर्भात महानगरपालिकेच्या मुख्य खात्याला मागणी केली असून पुढील बजेटमध्ये निधी उपलब्ध झाल्यावर हा रस्ता बनवण्यात येईल.
- अमोल पवार, सहाय्यक आयुक्त, वानवडी क्षेत्रीय कार्यालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RR Live: दे दणादण! वैभव सूर्यवंशीने पंजाबच्या गोलंदाजांचा केला पालापाचोळा; ८ चेंडूंत ४२ धावा, IPL 2026 मध्ये रचला इतिहास

Pune News : १०० दिवसात नागरी हितापेक्षा भ्रष्टाचाराला प्राधान्य; सत्ताधारी भाजपवर काँग्रेसची टीका

यवतमाळ हादरलं! अनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणाचा झोपेतच गेम; छतावर चढून कुर्‍हाडीने सपासप वार

विधान परिषदेसाठी भाजपकडून ६ उमेदवारांची घोषणा, कुणाला मिळाली संधी? वाचा यादी...

Harihar Panchamasali Math Controversy : पंचमसाली मठात हायव्होल्टेज ड्रामा! वचनानंद स्वामी आणि ट्रस्टींमध्ये जुंपली; कोट्यवधींच्या हिशेबावरून तीव्र वाद

SCROLL FOR NEXT