प्राणीसंग्रहालयात वाघीण पाहण्यासाठी झालेली पर्यटकांची गर्दी. Sakal
पुणे

पुणे : कात्रजच्या प्राणी संग्रहालयात अभूतपूर्व गर्दी

एका दिवसात २२ हजार पर्यटकांची भेट आणि साडेसात लाख रुपयांचे उत्पन्न

सकाळ वृत्तसेवा

कात्रज - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १४ मार्च २०२० रोजी बंद करण्यात आलेले राजीव गांधी प्राणी संग्रहालय २० मार्च २०२२ रोजी पर्यटकांसाठी खुले करण्यात आले. त्यानंतर उन्हाळी सुटीमुळे प्राणी संग्रहालयात भेट देण्यासाठी लहान मुलांसह अबालवृद्धांची गर्दी होत आहे. सध्या शाळेला सुट्या आहेत. तसेच, शनिवारी आणि रविवारी पालकांसाठीही सुटीचा दिवस असतो. या पार्श्वभूमीवर रविवारी (ता. १५) प्राणिसंग्रहालयात अभूतपूर्व गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. रविवारी एकूण २२ हजार १८२ पर्यटकांनी प्राणीसंग्रहालयाला भेट दिली. यातून प्राणीसंग्रहालयाला ७ लाख ५६ हजार ४६० रुपयांचे उत्पन्न मिळाले. हा आतापर्यंतचा उच्चांक असून आतापर्यंत म्हणजेच कोरोनाच्या आधीसुद्धा २० हजार पर्यंटकांपर्यंतच गर्दीचा आकडा गेला होता. मात्र, यावेळी पहिल्यांदाच गर्दीने २२ हजारांचा आकडा पार केल्याची माहिती प्राणीसंग्रहालय प्रशासनाने दिली आहे.

सुटी नसेल त्या दिवशी जास्त गर्दी होताना दिसत नाही. साधारणतः ४ ते ७ हजारांपर्यंत पर्यटक भेटी देत असल्याने दिसून येते. गेल्या रविवारी म्हणजेच ८ मे रोजीही चांगला प्रतिसाद मिळाला होता. एकूण १७ हजार २५६ पर्यंटकांनी भेटी दिल्या होत्या. त्यातून प्राणी संग्रहालयाला ५ लाख ८७ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. कोरोनानंतर प्राणी संग्रहालय सुरु झाल्यापासून २० मार्च ते ७ मे या ४७ दिवसांत ३ लाख ५ हजार ३४४ पर्यटकांनी भेट दिली आहे. यातून प्राणीसंग्रहालयाला आतापर्यंत १ कोटी २२ हजार ९५५ रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे.

तिकीट बुकींग ऑनलाईन कधी?

पर्यटकांची तिकीट खरेदी करण्यासाठी तिकीट खिडकीवर रांग लागलेली असते. ती रांग तशीच पुढे पादचारी मार्गांवरही येते. त्यामुळे प्रशासन ऑनलाईन बुकींग सुरु करणार आहे. मात्र, प्रत्यक्षात ही सेवा कधी सुरु होणार असा प्रश्न पर्यटक उपस्थित करत आहेत. ही सेवा लवकर सुरु झाली तर पर्यटकांना तिकीट खिडकीवर रांग लावावी लागणार नाही आणि पादचारी मार्गांवर होणाऱ्या गर्दीचाही सामना करावा लागणार नाही.

कोरोनानंतर लोक उत्साहात बाहेर पडत आहेत. तसेच, दोन वर्षे प्राणी बघता न आल्याने बच्चेकंपनीदेखिल प्राण्यांना पाहण्यासाठी आतूर होती. त्यात आता शाळांना सुट्या असून रविवारच्या सुटीचे औचित्य साधत पर्यटक प्राणी संग्रहालायाला मोठ्या प्रमाणात भेटी देत आहेत. प्राणी संग्रहालयाला भेट देण्यासाठी प्राधान्याने येत असलेल्या सर्व वन्यपर्यटकांचे आभार!

- राजकुमार जाधव, संचालक, राजीव गांधी प्राणीसंग्राहलय, कात्रज.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा; १० जिल्ह्यांना IMDचा रेड अलर्ट, पुढील ४८ तास अतिवृष्टीचा धोका

Commonwealth Games 2026: भल्याभल्यांना टक्कर दिली, भारताची २० वर्षांची वाघिण जगाला भिडली! कोण आहे मार्टिना देवी मैबाम? थोडक्यात हुकले पदक

Karnataka HIV student: कर्नाटकमध्ये खरंच सात हजार विद्यार्थ्यांना HIV लागण? 'एड्स प्रिव्हेंशन सोसायटी'कडून अधिकृत निवेदन जारी

Commonwealth Para Athletics: तोरणडोंगरीच्या जिल्हा परिषद शाळेतील दिलीप गावितची ग्लास्गो राष्ट्रकुल पॅरा अ‍ॅथलेटिक्समध्ये सुवर्णभरारी

Ambad Vegetable Market: अंबडच्या आठवडी बाजारात पावसाने भाजीपाल्याची मोठी नासाडी; शेतकरी‑विक्रेते बेभाव विक्रीला मजबूर

SCROLL FOR NEXT