Pune Porsche Accident  esakal
पुणे

Pune Porsche Accident : मुलांना पालकांकडून अनिर्बंध स्वातंत्र्य.. हे प्रकार टाळण्यासाठी काय करता येईल?

‘पालक आणि मुलांमधील कमी होणारा संवाद, मुलांना मिळणारे अनिर्बंध स्वातंत्र्य, व्यसनाधीनता याचा परिणाम म्हणून मुले बेफिकीर होऊ लागली आहे. यातूनच दुर्दैवी प्रसंग ओढवतात.

सकाळ वृत्तसेवा

‘पालक आणि मुलांमधील कमी होणारा संवाद, मुलांना मिळणारे अनिर्बंध स्वातंत्र्य, व्यसनाधीनता याचा परिणाम म्हणून मुले बेफिकीर होऊ लागली आहे. यातूनच असे दुर्दैवी प्रसंग ओढवतात. अल्पवयीन मुलांची ही मानसिकता चिंताजनक आहे’, असे मत शहरातील मानसोपचारतज्ज्ञांनी व्यक्त केले.

ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मृदुला आपटे म्हणाले, ‘अलीकडे मुलांचे स्वतःच्या मनावरील नियंत्रण कमी झाले आहे, आई-वडीलही मुलांना अनिर्बंध स्वातंत्र्य देत आहेत. मुलांवर कोणत्याच बाबतीत नियंत्रण न ठेवण्याची पालकांची भूमिका आहे. अनेक मुले आई-वडिलांपासून दूर पण राहतात. त्यांना सामाजिक जबाबदारीची जाणीव नसते.

त्यात ‘पीअर प्रेशर’ आहे, पैसे खूप आले आहेत आणि मुलांची मनाविरुद्ध गोष्टी स्वीकारण्याची क्षमता कमी झाली आहे. पटकन चिडायचे, त्यातून अविचारी प्रतिक्रिया द्यायची आणि मग व्यसनाकडे वळणे, राग काढण्यासाठी गाडी वेड्यावाकड्या पद्धतीने चालवणे, असे प्रकार मुलांमध्ये दिसून येतात.’

मानसतज्ज्ञ आरती पेंडसे म्हणल्या, ‘अल्पवयीन मुलांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. या प्रकरणामुळे ते पुन्हा एकदा समोर आले. या प्रकरणात मुख्यत्वे पालकांची सर्वांत मोठी चूक आहे. त्यांचा मुलगा चालकाला बरोबर घेऊन गेला म्हणजे तो कोठे गेला, याची त्याच्या पालकांना कल्पना होती. मग अल्पवयीन मुलाला मद्य घेण्यासाठी हॉटेलमध्ये जाण्याची परवानगी त्यांनी दिलीच कशी?’

‘चुकीचे पालकत्व जबाबदार’

‘या प्रकरणाला पूर्णतः चुकीचे पालकत्व जबाबदार आहे. मुलगा अल्पवयीन असतानाही त्याला रात्री दोनपर्यंत पार्टी करण्याची परवानगी देणे, त्याच्या हातात गाडी देणे, या चुका त्याच्या पालकांनी केल्या आहेत. चुकीच्या पालकत्वामुळेच व्यसनाधीनता, मोबाईलचे ॲडिक्शन या गोष्टी होतात,’ असे मत मानसोपचारतज्ज्ञ डॉ. श्रीकांत पवार यांनी व्यक्त केले. अल्पवयीन मुलाने चोरी केल्यावर बाल सुधारगृहात पाठवले जाते. मग या आरोपीला सुधारगृहात का पाठवले जात नाही’, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

हे प्रकार टाळण्यासाठी काय करता येईल?

  • लहानपणापासून मुलांना सामाजिक जबाबदारीची जाणीव देणे

  • मुलांना आपल्या भावनांचे व्यवस्थापन करण्यास शिकवणे

  • व्यसनांच्या दुष्परिणामांविषयी सातत्याने मुलांना सांगत राहणे

  • मुलांचा एकटेपणा कमी करण्यासाठी प्रयत्न करणे

  • मुलांच्या मनात व्यसनांना ‘प्रतिष्ठा’ मिळू नये, याची सर्व स्तरांतून काळजी घ्यावी

  • पालकांनाही पालकत्वाविषयी प्रशिक्षण द्यायला हवे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Blast : पाकिस्तान हादरले ! मशि‍दीजवळ स्फोटात १५ ठार, ५० हून अधिक जखमी; मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

३ महिलांनी बनवली फिल्म, ६०-६० लाखांच्या बजेटपासून तब्बल ३०० कोटींची कमाई; अवघ्या ४१ दिवसांत 'या' सिनेमाने रचला मोठा विक्रम

Garlic for High Cholesterol : सकाळी रिकाम्या पोटी कच्चा लसूण खाल्ल्याने खरंच कोलेस्ट्रॉल कमी होते का? NCBI संशोधनातून काय समोर आले?

Marathi News Live Updates : शक्तिपीठ महामार्गात जाणाऱ्या जमिनींना बाजारमूल्याच्या चौपट मोबदला शक्य, शासनाकडून नियमावली जाहीर

Girl Chasing Abhishek Sharma: अभिषेक शर्माच्या दिशेने पळाली तरुणी; रडली, ओरडायला लागली... हॉटेलमध्ये नेमकं काय घडलं? Video

SCROLL FOR NEXT