unsanitary conditions in Damodar Raoji Galande hospital building pune Sakal
पुणे

कै. दामोदर रावजी गलांडे दवाखान्याच्या इमारतीतच अस्वच्छता; शास्त्रीनगर, तीन विभागांचे एकमेकांकडे बोट

शास्त्रीनगर येथील दवाखान्याच्या इमारतीच्या तळमजल्यावर दवाखाना, आरोग्य कोठी आणि कीटक प्रतिबंधक विभाग आहे.

सकाळ वृत्तसेवा

वडगाव शेरी : येरवडा येथील शास्त्रीनगर चौकात असलेल्या कै. दामोदर रावजी गलांडे दवाखान्याची इमारत अडगळीच्या साहित्याने वेढली गेली आहे. या इमारतीत असलेला कीटक प्रतिबंधक विभाग, आरोग्य कोठी आणि दवाखान्याचे कर्मचारी एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. त्यामुळे याला कीटक प्रतिबंधक विभाग म्हणावे की कीटक निर्मिती विभाग, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

शास्त्रीनगर येथील दवाखान्याच्या इमारतीच्या तळमजल्यावर दवाखाना, आरोग्य कोठी आणि कीटक प्रतिबंधक विभाग आहे. तर पहिल्या मजल्यावर रक्त लघवी तपासणी, तसेच आधार नोंदणी केंद्र आहे.

यासाठी रोज शेकडो नागरिक या ठिकाणी येत असतात . परंतु पहिल्या मजल्यावर जाण्याकरता जिन्याने प्रवेश केल्यावर दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणात पडलेले अडगळीचे साहित्य नजरेस पडते. तसेच पहिल्या मजल्यावर रक्त लघवी तपासण्याच्या खोलीसमोरही मोठ्या प्रमाणात अडगळीचे साहित्य पडले आहे. पहिल्या मजल्याच्या बाल्कनीतही अडगळीच्या साहित्याने जागा व्यापली आहे.

पायऱ्या चढून वर जाताना कोपऱ्यांमध्ये गुटखा आणि तंबाखूच्या पिचकारी मारलेल्या नजरेस पडतात. याविषयी विचारणा केल्यावर कीटक प्रतिबंधक विभाग , आरोग्य कोठीचे मुकादम आणि दवाखान्यातील आरोग्य अधिकारी या तिघांनी या इमारतीतील अस्वच्छतेला आणि अडगळीच्या सामानाला एकमेकांना जबाबदार धरीत एकमेकांकडे बोट दाखवले.

कीटक प्रतिबंधक विभागाचे निरीक्षक मिलिंद घाटे म्हणाले, आमच्या कार्यालयाचे काम सुरू असल्यामुळे आम्ही लोखंडी ड्रम दवाखान्याच्या इमारतीत ठेवले होते. सकाळ’ने संपर्क साधल्यानंतर लागलीच त्यांनी दोन कर्मचारी पाठवून येथील ड्रम हटवले आणि येथे शिल्लक राहिलेले अडगळीचे साहित्य आमचे नाही असे म्हणत त्या साहित्यावरच औषध फवारणी केली.

सकाळ प्रतिनिधीने हा प्रकार समोर आणल्यानंतर आरोग्य अधिकारी डॉ. विजय बडे यांनी दवाखान्यातील काही कर्मचाऱ्यांना बोलावून स्वच्छतेचे आदेश दिले.

तर आरोग्य कोठीतील मुकादमांनी, आम्ही नियमित सफाई करतो असे म्हणत येथील अडगळीचे साहित्य कोठे टाकावे, हा प्रश्न असल्याचे सांगितले. त्यामुळे एकंदरीतच आरोग्य मंदिर असलेल्या इमारतीत अस्वच्छतेची स्थिती शोभनीय नसल्याचे येथील येणाऱ्या नागरिकांनी सांगितले.

आरोग्य खात्याच्या इमारतीत तरी स्वच्छता असावी अशी आमची माफक अपेक्षा आहे. लोकांना स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या विभागाने अगोदर स्वतःचे कार्यालय स्वच्छ करून आदर्श निर्माण करावा.

- करीम शेख ( स्थानिक रहिवासी)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi NIA Custody : अनमोल बिश्नोईला ११ दिवसांच्या NIA कोठडी!, पटियाला हाऊस कोर्टाचा निर्णय

Pakistan Involvement in Red Fort Blast : अखेर पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा फाटलाच! दिल्ली स्फोटातील सहभागाची नेत्यानेच दिली कबूली

Petrol Pump : पेट्रोल पंप संध्याकाळी सातनंतर बंद करण्याचा निर्णय मागे; पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा निर्णय

Mundhwa Land Case : मुंढवा जमीन प्रकरणात शीतल तेजवानींचा जबाब नोंदविला

Pravin Darekar : सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाला गती; सहकाराला आधुनिकतेची जोड द्यावी

SCROLL FOR NEXT