unseasonal rain affect pune lok sabha poll 2024 vote politics Sakal
पुणे

Hadapsar News : साडेसतरानळी मतदान केंद्रावर मतदारांना कसरत करावा लागण्याचा धोका

"मतदान केंद्रासमोरील पाण्याचा निचरा करून गाळाची साफ सफाई करण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांना सांगितले

कृष्णकांत कोबल

हडपसर : नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे साडेसतरानळी येथील जिल्हा परिषद शाळा मतदान केंद्रासमोर मोठ्या प्रमाणात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे येथे मतदानासाठी येणाऱ्या मतदारांना मोठी कसरत करावी लागणार आहे. निवडणूक आयोगाने याबाबत गांभीर्याने घेऊन त्यावर उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

मतदानाचा अधिकार निर्विघ्नपणे बजावता यावा, मतदानाचा टक्का वाढावा, मतदार राजाला सुलभपणे मतदान मतदान करता यावे, यासाठी निवडणूक आयोगाकडून विविध उपाययोजना राबवून सुविधा दिल्या जात आहेत. प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजवावा म्हणून प्रबोधन केले जात आहे. असे असताना साडेसतरानळी येथील मतदान केंद्राच्या प्रवेशद्वारावरील मैदानावर साचलेल्या चिखलातून मतदारांना कसरत करावी लागणार असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

येथील जिल्हापरिषद शाळेत ११ मतदान केंद्रे आहेत. शनिवारी (ता.११) सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे मतदान केंद्राच्या प्रवेशद्वारा समोरील मैदानावर मोठ्या प्रमाणात पाणी साठले होते. आज येथे त्यातून मोठ्या प्रमाणात चिखल निर्माण झाला आहे. हवामान विभागाने आणखी दोन दिवस पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यानुसार पाऊस झाल्यास मतदारांना येथील केंद्रात मतदानास जाताना कसरत करावी लागणार असल्याचा धोका निर्माण झाला आहे.

"येथील मैदानात थोड्या पावसातही चिखल होतो. मोठ्या पावसात पाणी साठवून राहते. निवडणूक आयोगाने पालिकेकडून तात्काळ उपायोजना करून घ्यावी, त्यामुळे मतदारांना सुलभपणे मतदानास जाता येईल.'

- राहुल तुपे, मतदार

"मतदान केंद्रासमोरील पाण्याचा निचरा करून गाळाची साफ सफाई करण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांना सांगितले आहे. त्याचे काम सुरू आहे. मतदारांना येथून प्रवास करताना कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी घेतली जाईल.

- शैलेंद्र काठवटे परिमंडल अधिकारी, निवडणूक आयोग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

Asia Cup Final: स्मृती मानधना - शफली वर्माचे तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड! भारताचे श्रीलंकेसमोर भलंमोठं लक्ष्य

SCROLL FOR NEXT