Unseasonal Rain in pune weather forecast electricity  rain
पुणे

Unseasonal Rain : जोरदार पावसाची पुण्यात हजेरी

मुख्य शहरासह उपनगरात अनेक ठिकाणी वादळी पाऊस पडल्याने नागरिकांमध्ये काहीसे भितीचे वातावरण

अक्षता पवार - सकाळ वृत्तसेवा

पुणे : विजांच्या कडकडाट, वादळी वारे आणि मेघगर्जनेसह पुणे शहरात गुरुवारी (ता. १३) संध्याकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली. दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना हा पाऊस दिलासादायक नक्कीच नव्हता. कारण, मुख्य शहरासह उपनगरात अनेक ठिकाणी वादळी पाऊस पडल्याने नागरिकांमध्ये काहीसे भितीचे वातावरण होते.

आठवड्या भरापासूनच शहरात पावसाची ये-जा सुरूच आहे. हवामानाचे स्थानिक घटक तसेच राज्यावर निर्माण होणाऱ्या प्रणालींमुळे ढगांची निर्मिती होत पुणे व परिसरात पाऊस दमदार कोसळत आहे. पुण्याला पुढील चार दिवस ‘येलो अलर्ट’ हवामानशास्त्र विभागाने जाहीर केला आहे.

दिवसा उन्हाचे चटके आणि सायंकाळी ढगाळ हवामान होताच पडणारा पाऊस अशी स्थिती सध्या पुण्यात अनुभवायला मिळत आहे. शहरात गुरुवारी (ता. १३) दिवसभर उन्हाची स्थिती होती, त्यात सायंकाळी ढगाळ वातावरणाची निर्मिती होत वादळी पावसाला सुरवात झाली. साधारणपणे पुणे परिसरावर ११ किलोमीटर उंचीचे ढग निर्माण झाले होते.

परिणामी मेघगर्जना विजांच्या कडकडाट होत पावसाने मुख्य शहरासह खडकवासला, वाकड, सूस रस्ता, खडकी, कोथरूड, औंध, पाषाणसह विविध ठिकाणी वाऱ्यांसह जोरदार ते मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्या. जोरदार बरसणाऱ्या पावसामुळे बऱ्याच भागात रस्त्यांवर वाहणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे अक्षरशः वाहनचालकांची देखील तारांबळ उडाली.

तर जिल्ह्यातील तुरळक भागात गारांचा पाऊस झाला. यासाठी शहर व परिसरात मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यांसाठी येलो अलर्ट ही देण्यात आले होते. सध्या उत्तर-दक्षिण हवेच्या कमी दाबाचा पट्टा हा पुणे व परिसरालगत असल्याने पावसाची स्थिती निर्माण झाली आहे.

गेल्या आठवडाभरापासून शहरात प्रत्येक दुसऱ्या दिवशी जोरदार पावसाची नोंद होत आहे. उन्हाळ्याच्या हंगामात पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे दोन्ही वातावरणाची अनुभूती पुणेकरांना होत आहे. त्यात पावसाच्या हजेरीमुळे हवेत गारवा ही जाणवत आहे.

येत्या सोमवारपर्यंत (ता. १७) शहर आणि परिसरात विजांचा कडकडाट आणि पावसाची एकाद दुसरी जोरदार सर होऊ शकते. यावेळी वादळी वारे देखील वाहतील असा अंदाज आहे. तर शुक्रवारी (ता. १४) देखील शहरात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन हवामानशास्त्र विभागाने केले आहे.

पावसासाठी पोषक हवामान

एकूणच हवामानाची स्थिती पाहिली तर नैर्ऋत्य राजस्थान व लगतच्या परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय आहे. त्यात पूर्व विदर्भापासून, मराठवाडा, कर्नाटक किनारपट्टीपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. पावसासाठी हे अनुकूल स्थिती होत असून पुढील चार दिवस मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाऊस कायम राहणार आहे. तर शुक्रवारी (ता. १४) मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT