खडकवासला : वारजे येथे बाह्यवळण महामार्गावर मंगळवारी संध्याकाळी साताऱ्याकडे बाजूला पावसाचे पाणी साठल्याने डुक्कर खिंडीपर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे. तर महामार्गावरील वाहने सेवा रस्त्यावर आल्याने रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. रात्री दहा वाजले तरी रांगा कायम होत्या.
बाह्यवळण महामार्गावर साताऱ्याकडे बाजूला वारजे येथे मुठा नदीच्या पुलावर, पावसाचे पाणी साठले होते. वाहतूक संथ गतीने सुरु होती. तर ढोणेवाडा हॉटेल, जोशी वडेवाले समोर नेहमीचा बॉटलनेक असल्याने डुक्कर खिंडीपर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे. अशी माहिती वारजे वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल पवार यांनी सांगितले.
शहराच्या पश्चिम बाह्यवळण महामार्गावर वारजे ओढ्याच्या पुलावर काम सुरु आहे. तेथे रस्ता अरुंद झाला आहे. रोज संध्याकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत महामार्गावर खासगी प्रवासी बसचा वारजे येथे थांबा झाला आहे. खासगी प्रवासी बस पाच- दहा मिनिटांचा हॉल्ट घेतात. त्यात प्रवाशांची चढ- उतार होते. येथे जास्त रहदारीमूळे वाहतूक कोंडी होते.
अन चांदणी चौकाच्या दिशने वाहनांच्या रांगा लागत असल्याचे जानेवारी मध्ये केलेल्या पाहणीत आढळले. आज पाऊस झाल्याने त्यात आणखी भर पडली. याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे संजय कदम म्हणाले, पाऊस पडला आहे. नागरिक चुकीच्या पद्धतीने वाहने चालवतात. यामुळे कोंडी झाली आहे. उलट्या दिशेने देखील वाहने येत असल्याने वारजे येथे महामार्गावर आणि सेवा रस्त्यावर त्यात अधिक भर पडली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.