pune
pune  
पुणे

लोकशाहीर अण्णा भाऊ साठें जन्मशताब्दीनिमित्त बोधचिन्हाचे अनावरण

सकाळ वृत्तसेवा

पुणे : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त तयार करण्यात आलेल्या बोधचिन्हाचे अनावरण संत साहित्याचे अभ्यासक सदानंद मोरे, महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते करण्यात आले. यानिमित्त संवाद पुणे, स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ३० जुलै २०१९ ते ३ ऑगस्ट २०१९ या कालावधीत छायाचित्र प्रदर्शन, कथा कादंबऱ्या, नाटक व इतर साहित्याचे प्रदर्शन होणार आहे. 

बालगंधर्व रंगमंदिर मध्ये परिसंवाद, चर्चा सत्र, अभिवाचन, ऑडिओ बुक प्रकाशन, कवी संमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम, जीवन गौरव पुरस्कार, कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी बरोबरच १ ऑगस्ट
२०१९ ला लोकमान्य टिळक यांच्या स्मृतीशताब्दी वर्षाला प्रारंभ होत आहे. या
निमित्ताने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुतळा, सारसबाग ते केसरी वाडा, टिळक रस्ता येथे ग्रंथ दिंडीचे आयोजन ३१ जुलै २०१९ करण्यात आले आहे. अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 

यावेळी निमंत्रक राजेश पांडे, सुनिल महाजन, प्रा. मिलिंद जोशी, निकिता मोघे व स्वागत अध्यक्ष सुनिल कांबळे उपस्थित होते. या  जन्मशताब्दीनिमित्ताने होणाऱ्या विविध कार्यक्रमांमध्ये नाट्य, चित्रपट, साहित्य, संगीत, शाहीर अशा क्षेत्रातील विविध संस्था सहभागी होणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: अर्धशतकवीर पोरेलपाठोपाठ ऋषभ पंतही झाला बाद, दिल्लीचा निम्मा संघ परतला माघारी

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

Latest Marathi News Live Update : PDCC बँकेवर आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT