UPSC Result 2024
UPSC Result 2024 sakal
पुणे

UPSC Result 2024 : माळेगावचा निरंजन जाधवराव यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण

कल्याण पाचांगणे : सकाळ वृत्तसेवा

माळेगाव : माळेगाव बुद्रूक (ता. बारामती) येथील निरंजन महेंद्रसिंह जाधवराव या युवकाने २८७ रैंक मिळवून यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाला. केंद्रीय लोकसेवा आयोगाने सन २०२३ मध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल मंगळवार (ता.१६)रोजी जाहीर केला. त्यामध्ये निरंजन जाधवराव यशस्वी झाल्याने माळेगावसह बारामती तालुक्यात समाधान व्यक्त होत आहे. तसेच निरंजन हा यूपीएससीत बाजिगर ठरल्याने माळेगावातील त्याच्या मित्रपरिवाराने फटाक्यांची अतषबाजी करीत आनंद व्यक्त केला.

सोमेश्वरनगरमधील मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक महेंद्रसिंह जाधवराव यांचा निरंजन हा मुलगा आहे. निरंजन याचे बीई मॅकॅनिकल शिक्षण झाले असून सन २०१९ पासून स्पर्धा परिक्षा देत होता. याचाच अर्थ पहिल्या, दुसऱ्या प्रयत्नात अपयश आले म्हणून तो डगमगला नाही. भिती, निराशा आणि पच्छाताप या गोष्टीवर मात करणे तसे कठीण होते, परंतु इच्छाशक्तीच्या जोरावर पुन्हा पुन्हा प्रयत्न केला आणि निरंजने २८७ रैंक मिळविली. या प्रक्रियेत अभ्यासात सातत्य, जबरदस्त इच्छाशक्ती आणि कुटुंबाचा सपोर्ट खूप महत्वाचा असतो, असे मत निरंजने सकाळ शी बोलताना सांगितले. माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी, सुजित रुकारी, अनुपम जैन यांचे मार्गदर्शन मी विसरू शकत नाही, असेही त्याने आर्वजून सांगितले. जाधवराव कुटुंबियांना ऐतिहासिक वारसा आहे, हा वारसा आबाधित ठेवणाचा मी प्रशासकिय सेवेत प्रमाणिकपणे प्रयत्न करणार आहे, असाही विश्वास त्याने बोलून दाखविला.

`युपीएसी अथवा एमपीएससी परिक्षा यशस्वी झाला म्हणजे सर्वकाही समाधान मिळाले असे नव्हे, तर प्रशासकिय सेवेत प्रश्न सोडून जनतेला योग्यरित्या न्याय दिल्यानंतर मिळालेला आनंद वेगळाच असतो. वास्तविक हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून हजारो विद्यार्थी स्पर्धा परिक्षा, मुलाखती देत असतात. परंतु त्यापैकी मजक्याच मुलांना यश मिळले. याचा अर्थ अपयशी मुले हुशार नसतात असे कोणीही समजू नये. त्यांचे काहीशा गोष्टींत मार्क जातात, परंतु पुढील प्रयत्नात ते यशस्वी होतात हे माझे उदाहरण आहे, ` अशी प्रतिक्रिया निरंजन जाधवराव यांनी दिली.

निरंजनचा परिक्षार्थी विद्यार्थ्यांना सल्ला…

लालदिव्याची प्रतिष्ठा पाहून स्पर्धा परिक्षा देण्यापेक्षा आपण परिक्षेसाठी पुर्णपणे सक्षम आहोत का ? याचा विचार व्हावा, परिश्रम करण्याची तयारी हवी, केलेला अभ्यास नीट स्मरणात ठेवण्यासाठी स्मरणशक्ती वाढविण्याकडेही लक्ष द्यावे, अनेक ननुमा प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव असावा, परिक्षेचा विषय आणि त्या परिक्षेसाठी वापरायला लागणारी भाषा या दोन्ही गोष्टींचे आपल्याला पुर्ण आकलन असणे किंवा करून घेणे जरुरीचे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT