पुणे

कऱ्हाड संक्षिप्तचार

CD

जुन्या काेयना पुलावरील
खड्डे तातडीने बुजवावेत

कऱ्हाड : जुन्या कोयना पुलाच्या पूर्वेकडील बाजूच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे दुचाकीस्वारांची गैरसोय होत आहे. रात्रीच्या वेळी खड्डे निदर्शनास न आल्याने दुचाकी चालक महिलांचे किरकोळ अपघात होण्याचे प्रमाणही वाढले आहे. बांधकाम विभागाचे त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे अपघात होण्याची भीतीही व्यक्त हाेत आहे. त्यामुळे तातडीने संबंधित खड्डे बुजवावेत, अशी नागरिकांतून मागणी होत आहे.
..............................

उघड्यावर कचरा
टाकणारांवर कारवाई करा
कऱ्हाड ः शहरातील नागरिकांनी उघड्यावर कचरा न टाकता घंटागाडीत टाकावा, यासाठी दररोज सकाळी कचरा संकलनासाठी गाड्या शहरात फिरवण्यात येतात. मात्र, काही नागरिकांकडून शहर विविध ठिकाणी उघड्यावरच कचरा टाकून शहराला विद्रूप केले जाते. पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून त्यांच्या वेळेनुसार तो कचरा उचलला जातो. मात्र, शहरात उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर पालिकेने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
......................
एसआयआर मॅपिंगसाठी
मतदारांनी सहकार्य करावे

कऱ्हाड ः निवडणूक आयोगामार्फत मतदार यादीचा एसआयआर मॅपिंगचा करण्याचे काम सध्या सुरू आहे. २०२५ च्या मतदार यादीत नाव असणाऱ्या मतदारांनी २००२ मध्ये स्वतःचे किंवा आई-वडील किंवा आजी-आजोबांचे मतदान कोठे होते, याची माहिती विभागातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी किंवा त्यांना मदत करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना अचूकपणे देऊन सहकार्य करावे. त्याशिवाय मॅपिंगची प्रक्रिया पूर्ण होणार नाही. आपले मतदार यादीत नाव कायम राहणार नाही. तरी मॅपिंग पूर्ण न झालेल्या मतदारांनी योग्य ती माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार कल्पना ढवळे यांनी केले आहे.
..................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजयला ऐनवेळी धक्का! पाठिंब्याचं पत्र खोटं असल्याचा आरोप, आमदार बेपत्ता; TVKची तारेवरची कसरत, बहुमत जुळेना

Mumbai Bengaluru Vande Bharat : मुंबई-बंगळूर ‘वंदे भारत’ अखेर मिरजमार्गे धावणार, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची माहिती

LPG Cylinder Price: घरगुती गॅसपासून वाहनांच्या इंधनापर्यंत मोठी अपडेट; तुमच्या शहरात आजचा दर किती?

Pandharpur 10th Board Result: गवंड्याच्या मुलीचा दहावीच्या परिक्षेत डंका साक्षी वाघमारे 83 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम

नको बक्षिसे...नको मिरवणुका, आमच्या यशाची दखल तरी घ्या!; थॉमस करंडक बॅडमिंटन स्पर्धेतील ब्राँझपदक विजेत्या सात्त्विकराज रंकीरेड्डी याची खंत

SCROLL FOR NEXT