पुणे

कास - शशिकांत शिंदे यांचे पाटबंधारे विभागाला निवेदन....

CD

टंचाईपूर्वी कुडाळी प्रकल्पाचे पाणी सोडा

शशिकांत शिंदे; लाभक्षेत्रातील गावांना पाणी देण्याची मागणी

कास, ता. ७ ः जावळी तालुक्यातील कुडाळी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात अत्यल्प पावसामुळे टंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. सरताळे, कापसेवाडी भागातील परिस्थितीची पाहणी केली असता पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांच्या पाणीप्रश्नाकडे लक्ष देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केली आहे.
याबाबत त्यांनी सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळाच्या अधीक्षक अभियंत्यांना निवेदन देऊन कुडाळी प्रकल्पाच्या कालव्याची तात्पुरती जोडणी करून डाव्या कालव्यातून धरणाचे पाणी सोडावे, अशी मागणी केली आहे. कुडाळी प्रकल्पाच्या कालव्याची पाइपलाइनद्वारे बहुतांशी कामे पूर्ण झालेली आहेत. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा उपयोग लाभक्षेत्रातील गावांना करण्यासाठी आवश्यक ती तात्पुरती जोडणी करून पाणी सोडण्याची कार्यवाही तातडीने करावी, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
यंदा अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्याने तालुक्यातील अनेक भागांमध्ये पाण्याची परिस्थिती गंभीर होण्याची चिन्हे आहेत. विशेषतः कुडाळी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थ आणि शेतकरी सातत्याने कॅनॉलद्वारे प्रकल्पाचे पाणी सोडण्याची मागणी करत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
पाणी उपलब्ध असताना केवळ कालव्याची जोडणी किंवा तांत्रिक बाबींमुळे त्याचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू नये, अशी परिस्थिती निर्माण होऊ नये. त्यामुळे संबंधित यंत्रणेने तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक तांत्रिक कार्यवाही पूर्ण करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. टंचाईची परिस्थिती अधिक गंभीर होण्याची वाट न पाहता पाटबंधारे विभागाने उपलब्ध पाण्याचे नियोजन करून तातडीने निर्णय घ्यावा, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
-------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Milk Adulteration : दुध भेसळीचे धागेदोरे मंचरपासून सोलापूर, इंदापूरपर्यंत; ‘एफडीए’ ने काढली भेसळखोरांची कुंडली, 'सोनाई डेअरी'ला भेसळयुक्त दूधाचा पुरवठा

Pune News : आम्ही अधिकारी होण्याचे स्वप्न बघायचे नाही का?; महाज्योतीच्या विद्यार्थ्यांचा सवाल, दोन केंद्रावरील परीक्षा रद्द

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

Shendurwada News : रक्तरंजित वाळू, जमिनीच्या व्यवहाराची नशा, अन् विकासकामांतील भ्रष्टाचार मार्गाने पैसा कमावण्याचा नाद सुटेना

MPSC Agitation Suspended : एमपीएससी विद्यार्थ्यांचे टिळक चौकातील आंदोलन स्थगित; उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर निर्णय

SCROLL FOR NEXT