पुणे

सांगोल्यात २१ हजार क्विंटल मका खरेदीविना; शेतकऱ्यांत तीव्र नाराजी

CD

सांगोल्यात २१ हजार क्विंटल मका खरेदीविना पडून
केवळ १४ दिवस खरेदी; हमीभावापेक्षा ६०० रुपयांनी कमी दराने विक्रीची वेळ
दत्तात्रय खंडागळे : सकाळ वृत्तसेवा
सांगोला, ता. २० : तालुक्यात यंदा मका पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले असताना, शासनाकडून केवळ १४ दिवसच मका खरेदी करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. नोंदणी करूनही तब्बल ७४१ शेतकऱ्यांचा सुमारे २१ हजार १९८ क्विंटल मका खरेदीविना शेतकऱ्यांच्या दारात पडून आहे.
राज्य शासनामार्फत किमान आधारभूत किंमत (एमएसपी) २४०० रुपये प्रतिक्विंटल दराने भरडधान्य खरेदी केंद्राचा प्रारंभ आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख व तहसीलदार बाळूताई भागवत यांच्या हस्ते करण्यात आला होता. सांगोला तालुक्यातील सुमारे ९१३ शेतकऱ्यांनी ११२५ हेक्टर क्षेत्रावरील २६ हजार ४६५ क्विंटल मक्याची नोंदणी तालुका खरेदी-विक्री संघाकडे केली होती. मात्र फेडरेशनकडून ५ हजार क्विंटल खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यानुसार १७२ शेतकऱ्यांचा ५ हजार २६७ क्विंटल मका खरेदी करण्यात आला. उद्दिष्ट पूर्ण झाल्याने २१ जानेवारीपासून खरेदी प्रक्रिया बंद करण्यात आली. परिणामी, उर्वरित ७४१ शेतकऱ्यांचा २१ हजार १९८ क्विंटल मका अजूनही खरेदीच्या प्रतीक्षेत आहे.
दरम्यान, बाजारात भुसार व्यापाऱ्यांकडून सध्या १८०० रुपये प्रतिक्विंटल दराने मका खरेदी होत आहे. शासन दर आणि बाजारभाव यामध्ये प्रतिक्विंटल ६०० रुपयांचा फरक पडत असून, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. शासनाने त्वरित मका खरेदी केंद्र सुरू करून नोंदणी झालेली मका खरेदी करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
---
निवडणुका संपल्या; आता शेतकऱ्यांकडे लक्ष द्या
तालुक्यात डाळिंब पिकावर मर व इतर रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने डाळिंब क्षेत्र घटले. परिणामी, अनेक शेतकरी मका पिकाकडे वळले असून, कृषी विभागाकडे यंदा सर्वाधिक २६ हजार क्विंटलपेक्षा अधिक मक्याची नोंदणी झालेली असताना, केवळ ५ हजार क्विंटल खरेदी करून केंद्र बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे. नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या प्रश्नाकडे अपेक्षित गांभीर्याने लक्ष दिले गेले नाही, अशी भावना शेतकऱ्यांत व्यक्त होत आहे. काबाडकष्टाने पिकवलेल्या मक्याला योग्य दर मिळाला नाही तर शेती करायची कशी, असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. मका खरेदी केंद्र तातडीने सुरू करून नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांचा मका हमीभावाने खरेदी करावा, अन्यथा आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांकडून देण्यात येत आहे.
---
कोट
सोलापूर जिल्ह्यासाठी २५ हजार क्विंटल हमीभावाने मका खरेदीचे उद्दिष्ट दिले होते. उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर मका खरेदी केंद्र बंद करण्यात आले आहे. मका खरेदीसाठीचे उद्दिष्ट वाढवून मिळावे यासाठी आम्ही शासनाकडे पाठपुरावा केला असून, अद्याप आम्हाला कोणतीही सूचना आली नाही. वाढीव उद्दिष्ट मिळाले तर लगेचच मका खरेदी केली जाईल.
- मनोज वाजपेयी, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, सोलापूर
---
कोट
सांगोला तालुक्याला दिलेले ५ हजार क्विंटल मका खरेदीचे उद्दिष्ट खरेदी-विक्री संघाकडून पूर्ण केल्याने मका खरेदी बंद केली आहे. सोलापूर जिल्हाधिकारी यांच्याकडून खरेदीचे उद्दिष्ट वाढवून मिळाल्यानंतर शेतकऱ्यांची मका खरेदी केली जाईल. सांगोला तालुक्यात २० हजारांपेक्षा जास्त क्विंटल नोंदणी झालेली मका खरेदीविना पडून असल्यामुळे शेतकरी नियमित मका खरेदीबाबत चौकशी करीत आहेत. शासनाने काय तो लवकर निर्णय घ्यावा.
- रमेश जाधव, चेअरमन, खरेदी-विक्री संघ, सांगोला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT