पुणे

आष्टापुरात कृषी पंप चोरांचा धुमाकूळ

CD

उरुळी कांचन, ता. २४ : आष्टापूर, हिंगणगाव, भवरापूर, खामगाव टेक या हवेलीच्या पूर्व भागांमधील मुळा-मुठा नदीकाठी असलेल्या गावांतील शेतकऱ्यांच्या कृषी वीज पंपांची चोरी होण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसांपासून वाढले आहे. नदीकिनारी असणाऱ्या तीन मोटारी (वीज पंप) गुरुवारी (ता. २२) चोरीला गेल्या आहेत. दीड महिन्यापूर्वी सात मोटारी लांबविल्या आहेत. त्यामुळे धुमाकूळ घालणाऱ्या चोरट्यांचा शोध घ्यावा, अशी मागणी होत आहे.

बापू कटके, मारुती गलांडे, मारुती कोतवाल, भानुदास कोतवाल, प्रकाश मेमाणे, विलास जगताप, रामभाऊ जगताप, रमेश देवकर आदी शेतकऱ्यांच्या मोटारी चोरीला गेल्या आहेत. शेतकऱ्यांनी याबाबत लोणीकंद पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत. मात्र, अद्याप या मोटारी चोरणाऱ्यांचा शोध पोलिस यंत्रणेला लागलेला नाही, तसेच ११२ क्रमांकावर आम्ही शेतकऱ्यांनी फोन करून मदतीची याचना केली असतानादेखील पोलिस त्या ठिकाणी पोहोचू शकले नाहीत, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली.
दरम्यान, कमी वेळात जास्त मोटारींमधील तांब्याची तार चोरण्याचा पराक्रम हे चोर करीत आहेत. ते रात्रीच्या वेळी नदीकिनारी असणाऱ्या शेतकऱ्यांच्या मोटारी, स्वयंचलित कटर वापरून या पंपांची लोखंडी बॉडी कापून, त्यामध्ये असलेल्या तांब्याच्या तारा काढून घेऊन बाकी सर्व साहित्य तेथेच टाकून पोबारा करतात.

चोरांना आम्ही रोख पैसे देऊ
शेतकऱ्यांनी याबाबत आपली उपहासात्मक प्रतिक्रिया देताना सांगितले की, या भागात आमच्या १०, ७.५०, ५ हॉर्स पॉवरच्या मोटारी आहेत. या मोटारींची किंमत ५० ते ८० हजारांच्या दरम्यान आहे. यातील तांब्याच्या तारेची किंमत अंदाजे ३ ते ५ हजारांच्या दरम्यान होते. मात्र या किरकोळ रकमेसाठी चोरटे आमच्या मोठ्या रकमेच्या मोटारींची नासाडी करतात. त्यामुळे पिकाला पाणी देण्यासही उशीर होऊन पिकाचेही नुकसान होते आहे. हे टाळण्यासाठी चोरांनी आम्हाला रोख पैसे मागावेत, आम्ही ते देऊ. मात्र आमच्या मोटारी तोडून फोडून नुकसान करू नये.

01740

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Career Growth: ज्याला तीन लाख वार्षिक पगाराच्या कामावरून कंपनीने काढलं, त्याच तरुणाला आली दुबईतील १.५ कोटींच्या नोकरीची ऑफर

Sukanya Samruddhi Yojna : घरात तीन मुली आहेत? मग टेन्शन सोडा; जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजनेच्या नियमांतर्गत कशी उभी राहील कोटींची संपत्ती!

पुढच्या सात दिवसांत ४ राशींचं नशीब चमकणार! धनलाभासह करिअरमध्ये प्रगतीचे योग

Prithviraj Chavan : मनोज जरांगे-पाटलांचे नेतृत्व संपवायचे त्याचवेळी एकनाथ शिंदे यांच्यासारख्या नेत्यांना बदनाम करण्याचा कुटील डाव

CBI Arrests ED officers : दुसऱ्यांवर धाडी टाकणाऱ्या ED अधिकाऱ्यांवरच CBI ची झडप! केसमधून वाचवण्यासाठी केला होता 'हा' मोठा सौदा

SCROLL FOR NEXT