उरुळी कांचन, ता. ३ : दुष्काळाच्या गर्तेत अडकलेल्या जनतेवर पावसामुळे ‘कही खुशी कही गम’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. उरुळी कांचन परिसरात अकरा तासांत ३०.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याने ऑक्टोबरमधील तीव्र उष्णतेच्या त्रासाने त्रासलेल्या जनतेला या पावसाच्या थंडाव्याने दिलासा दिला आहे.
उरुळी परिसरात पावसाचा जोर सोमवारी पहाटे चारच्या दरम्यान अधिक होता. या पावसाने भात, सोयाबीन, बाजरी ही खरीप पिके पुरेशा पावसाअभावी धोक्यात आली होती, तरीही जी थोडीफार जगली होती, त्यांची काढणी झाली होती. मात्र भाजीपाला वर्गीय पिके, डाळिंबासारख्या फळझाडांचे नुकसान झाले. कांद्याची नवीन लागवड तसेच उसाच्या या पिकांना मदत होण्याची शक्यता आहे. खरीप हंगामाला दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागल्या तर रब्बीही दुष्काळाच्या छायेत अडकून पडला होता. या पावसाने गहू, हरभरा, चारा पिकांसाठी दिलासादायक वातावरण झाल्याने दिवाळीच्या तोंडावर उत्पादकांना थोडासा दिलासा मिळाला आहे.
पावसामुळे वनराईला जीवदान
सर्वदूर पडलेल्या पावसाने रखरखणारे वातावरण शांत झाले तर आहेच, पण डोंगर माथ्यावर असलेल्या वनराईला मिळालेल्या पाण्याने जीवदान मिळाले आहे. या पावसाने जमिनीतील पाण्याची पातळी वाढल्याने काही ठिकाणच्या पिण्याच्या पाण्याच्या समस्येला आधार मिळाला आहे. हा पाऊस नवरात्रीत पडला असता तर आणखी उत्साहात शेतीची कामे करता आली असती अन् दुष्काळाची तीव्रता कमी झाली असती, अशी भावना कस्तुरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद मेमाणे यांनी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.