पुणे

अमेरिकेशी व्यापार करार स्थगित करा

CD

अमेरिकेशी व्यापार करार स्थगित करा

काँग्रेसची मागणी; राहुल यांची पंतप्रधान मोदींवर टीका

सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. २१ ः अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर भारत-अमेरिका व्यापार करार तत्काळ स्थगित करावा, अशी मागणी मागणी काँग्रेसने केली आहे. तर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ‘‘ते तडजोडीच्या स्थितीत असून देशाशी केलेला विश्वासघात आता उघड झाला आहे,’’ असा आरोप राहुल यांनी केला आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या आयातशुल्काविरोधात अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टीकास्त्र सोडले. ‘‘पंतप्रधान तडजोडीच्या स्थितीत आहेत. ते पुन्हा वाटाघाटी करून हा व्यापार करार सुधारू शकणार नाहीत आणि पुन्हा शरणागती पत्करतील,’’ असा दावा राहुल गांधींनी ‘एक्स’द्वारे केला.
त्याचप्रमाणे, काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी आज पत्रकार परिषद घेऊन भारत-अमेरिका व्यापार करार स्थगित करण्याची मागणी केली. ‘‘अंतरिम कराराच्या चौकटी’त बदल करण्याची तरतूद स्पष्टपणे नमूद आहे. एका देशाने अटी बदलल्यास दुसऱ्या देशालाही तसे करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयाने व्यापार शुल्काबाबत दिलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर शुल्कातील संभाव्य बदलांच्या पार्श्वभूमीवर भारताने व्यापार करार स्थगित करावा,’’ असे ते म्हणाले.
अमेरिकेतील न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ देत जयराम रमेश यांनी प्रश्न उपस्थित केला की, दोन फेब्रुवारी रोजी अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्याकडून हा करार जाहीर करून घेण्यासाठी पंतप्रधान मोदींनी इतकी घाई का केली? ट्रम्प यांनी हा करार ‘माझे प्रिय मित्र पंतप्रधान मोदी यांच्या विनंतीवरून’ जाहीर करत असल्याचे म्हटले होते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. तसेच, संसदेत त्यादिवशी राहुल गांधी यांनी माजी लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांच्या खळबळजनक खुलाशांचा उल्लेख केला होता. यामुळे पंतप्रधान गोंधळले होते. त्यानंतर रात्री उशिरा करार जाहीर करून घेण्यात आला, असा दावा रमेश यांनी केला.

आयातशुल्क कायदाविरोधी
अमेरिकेने लादलेले परस्पर आयातशुल्क तेथील सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट बहुमताने रद्द केले. ट्रम्प यांना असे शुल्क लावण्याचा अधिकार नसल्याचे आणि ते अमेरिकेच्या कायदा व घटनेच्या विरोधात असल्याचे या निकालात स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचा संदर्भ देत जयराम रमेश म्हणाले, ‘‘अमेरिकेचे भारतावरील शुल्क १८ टक्क्यांवरून दहा टक्क्यांपर्यंत कमी झाल्याचा दावा चुकीचा आहे. प्रत्यक्षात ते ३.५ टक्क्यांवरून १० टक्क्यांपर्यंत वाढले आहे. अमेरिकी कृषी उत्पादनांना देण्यात येणाऱ्या विशेष सवलतींमुळे भारतीय शेतकऱ्यांच्या उपजीविकेला धोका निर्माण होणार आहे. सध्याच्या परिस्थितीत हा अंतरिम करार अमलात आणता येणार नाही, हे पंतप्रधानांनी स्पष्टपणे सांगावे. तसेच स्पष्टता येईपर्यंत आयात सुधारणा स्थगित ठेवाव्यात, अशी काँग्रेसची ठाम भूमिका आहे,’’ असे जयराम रमेश म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

खरातशी संबंधित मालमत्ता बड्या अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांच्या नावे, ईडीचा ससेमिरा मागे लागणार; सरकारी बाबूंचे धाबे दणाणले

US-Iran War: ''रात्रीतून सगळं संपेल...'' इराणसोबतच्या बैठकीवरुन अमेरिकेचं मोठं विधान

Chhatrapati Sambhajinagar: भामट्यांनी दोन दिवसांत हिसकावले तिघींचे मंगळसूत्र; सांगा, रात्री घराबाहेर जाणे टाळावे का?

Chhatrapati Sambhajinagar: उभ्या ट्रकला आयशर धडकला; वडोद बाजार फाट्यावरील घटना; चालक गंभीर जखमी

महाराष्ट्राला उष्णतेच्या लाटेचा इशारा, अकोला जगात सर्वात उष्ण शहर, टॉप १५ मध्ये राज्यातली पाच शहरं

SCROLL FOR NEXT